कार्यालयात जाण्यासाठी निघालेल्या एका व्यापाऱ्याला रस्त्यात अडवून त्याच्याकडील ३० लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना मुलुंड येथे घडली. पोलिसांनी हल्लेखोरांचे रेखाचित्र बनविले असून या हल्ल्यामागे माहीतगारांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मुलुंड पश्चिमेच्या लिंक रोडवरील सवरेदय नगरातील इंद्रप्रस्थ इमारतीत दीप खेरा (३२) हे लोखंडाचे व्यापारी राहतात. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते नवी मुंबई येथील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. आपल्या इमारतीच्या खाली ते खासगी टॅक्सीची वाट बघत उभे होते. साडेआठच्या सुमारास एक मारुती स्विफ्ट गाडी त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली. गाडीतून उतरलेल्या दोघांनी खेरा यांना चॉपर आणि कोयत्याचा धाक दाखवत त्यांच्याकडील बॅग हिसकावून घेतली.