देशातील वाढत्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव लक्षात घेता लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. पंढरपूरातील विठ्ठल मंदिर, कोल्हापूरातील अंबाबाई मंदिर तसेच शिर्डीचे साई मंदिरही बंद ठेवण्याचा निर्णय तेथील मंदिर समितीनं घेतला आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दी कमी करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत.

राज्यातील करोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून सिद्धीविनायक मंदिर व्यवस्थापनाकडूनही पुढील काही दिवस मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष, शिवसेनेचे सचिव तसेच अभिनेते असलेले आदेश बांदेकर यांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले की, पुढील काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, भाविकांची श्रद्धा पाहता त्यांच्यासाठी ऑनलाइन आरतीची सोय कऱण्यात आली आहे. मंदिराच्या अधिकृत फेसबुक आणि युट्यूबवर नियोजित वेळी आरती होणार आहे.

ravi jadhav shares post for chinmay mandlekar
“महाराष्ट्र सरकार आणि सायबर सेलकडे…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाची चिन्मय मांडलेकरसाठी पोस्ट, म्हणाले…
First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
janhvi kapoor walked barefoot with boyfriend shikhar pahariya mother smruti shinde
Video: जान्हवी कपूरचं ठरलं? बॉयफ्रेंडच्या आईसह अनवाणी चालत गेली सिद्धिविनायकाच्या दर्शनाला, प्रणिती शिंदेंचा भाचा आहे शिखर
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

पाहा आजची लाईव्ह आरती :

या वेळात होणार लाईव्ह आरती :

मंदिर दर्शनासाठी बंद असेल मात्र नित्याचे धार्मिक विधी पूजाऱ्यांमार्फत केले जाणार आहेत, असेही बांदेकर म्हणाले.