आठवडय़ात सहा पेटीएम ग्राहकांना गंडा

मुंबई : ऑनलाइन भामटय़ांनी पेटीएम वापरकर्त्यां वृद्धांकडे मोर्चा वळवला असून एका आठवडय़ात मुंबईतील सहा वृद्धांना पेटीएम के वायसी अद्ययावत करण्याच्या बहाण्याने भामटय़ांनी लाखो रुपयांचा गंडा घातला.

वृद्ध आणि गृहिणी स्मार्टफोन हाताळणीसह नवनवीन अ‍ॅपच्या वापराबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे भामटय़ांनी त्यांच्याकडे मोर्चा वळविला आहे, असे राज्याच्या सायबर विभागाचे उपाधीक्षक बालसिंग राजपूत यांनी सांगितले.

मुंबईत एकाच आठवडय़ात सहा वृद्धांना पेटीएम के वायसीच्या नावे गंडा घालण्यात आला. या प्रत्येकाने पेटीएम खाते बंद होईल या भीतीने भामटय़ांनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळून सर्व तपशील देऊ के ले. यातील एकाच तक्रारदाराने (लेखापाल) जुजबी प्रतिकार के ला. मात्र तेही भामटय़ांच्या भूलथापांना बळी पडले. यातील कोणी एनी डेस्कसारखी अ‍ॅप अजाणतेपणी डाऊनलोड के ली. कोणी सहजरित्या डेबीट, क्र ेडीट कार्डच्या तपशीलांसह ओटीपी क्रमांकही भामटय़ांना दिले.

पेटीएम खाते ब्लॉक होईल, अशी भीती घालत मलबार हिल परिसरात वास्तव्यास असलेल्या ६० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाच्या सहा बँक खात्यांमधून एकू ण एक लाख रुपये भामटय़ांनी परस्पर चोरले. तक्रारदार पेटीएम वापरकर्ते आहेत. त्यांना भामटय़ांनी एनी डेस्कसारखेच एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास आणि पेटीएम खात्यावर दहा रुपये जमा करण्यास भाग पाडले. त्यानंतर भ्रमणध्वनी क्र मांकावर प्राप्त ओटीपी क्र मांक परस्पर मिळवून सहा खात्यांवरून व्यवहार के ले. याच परिसरात वास्तव्यास असलेल्या ७७ वर्षीय वृद्धाला सुमारे अडीच लाखांचा गंडा पडला. तक्रोरदार प्रसिद्ध धर्मगुरूचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. दादरला वास्तव्यास असलेले ६० वर्षीय कँक्रिट वितरक, ताडदेव परिसरात राहाणारे ६३ वर्षीय लेखापाल यांचीही अशाच प्रकारे फसवणूक के ली गेली.

काय काळजी घ्यावी?

* पेटीएम , डेबीट-क्र डीट कार्ड वापरणाऱ्या वृद्धांनी कार्ड किं वा खाते ब्लॉक होईल, अशा आशयाच्या भूलथापांकडे  दुर्लक्ष करावे.

* लघुसंदेशाद्वारे आलेली लिंक, अनोळखी अ‍ॅप डाऊनलोड करू नये.

* ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावे आणि कार्ड तपशील, ओटीपी क्र मांक कोणालाही देऊ नये.

पाच महिन्यांत ऑनलाइन फसवणुकीचे १४८८ गुन्हे

जानेवारी ते मे या पाच महिन्यांत राज्यात १४८८ ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी फक्त ८८ गुन्ह्य़ांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्य़ांत क्र ेडीट कार्डचे तपशील मिळवून १०४, बनावट डेबीट कार्डद्वारे १७७, ऑनलाइन बँक व्यवहारासाठी आवश्यक तपशील मिळवून ४०२ तर ओटीपी क्र मांक मिळवून के लेल्या ११९ फसवणुकीच्या गुन्ह्य़ांचा समावेश आहे.