News Flash

मुंबईतील चर्नीरोड स्थानकाजवळ पुलाचा काही भाग कोसळला, दोन जण जखमी

एका बाजूने पूल झुकला असल्याचीही माहिती समोर

तोडकाम सुरू असतानाच या पुलाचा काही भाग कोसळून दोनजण जखमी झाले

मुंबईतील चर्नीरोड स्ठानकाजवळ असलेल्या पादचारी पुलाच्या पायऱ्यांचा काही भाग कोसळला. या घटनेत दोनजण जखमी झाल्याची माहितीही समोर येते आहे. मागील आठवड्यात याच पुलासाठी पथनाट्याच्या माध्यमातून ‘गेट वर्क सुन’ हे आंदोलनही झाले होते. त्यानंतर आंदोलकांनी पालिका अधिकाऱ्यांना काम लवकर सुरू करण्यासाठी निवेदनही दिले होते.

चर्नीरोडच्या डी वॉर्डमधील महर्षी कर्वे रोडवर असलेला हा पादचारी पूल आहे. एका बाजूने हा पूल झुकला असल्याचीही माहिती समोर येते आहे. हा पूल धोकादायक असल्याने त्याच्या पुनर्बांधणीकरता तोडकाम हाती घेण्यात आले होते. मात्र रेल्वेच्या हाय टेन्शन केबल्स गेल्यामुळे हे काम काही दिवसांपासून थांबवण्यात आले होते.

चर्नी रोड येथील घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शनिवारी रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान ही घटना घडली. २०१४ पासून या पुलाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्याचे काम स्थानिक नगरसेवकांनी आणि नागरिकांनी केले होते अशीही माहिती समोर येते आहे.

एल्फिन्स्टन  पुलाच्या आधीपासून चर्नीरोड येथील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र महापालिकेने काहीही केले नाही. शनिवारी या पुलाचा काही भाग कोसळून दोनजण जखमी झाले. ‘एएनआय’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. मुंबईतील धोकादायक पुलांचा प्रश्न एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर ऐरणीवर आला आहे. २९ सप्टेंबरला चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला तर ३८ प्रवासी जखमी झाले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2017 9:49 pm

Web Title: some part of charni road bridge collapsed two injured
Next Stories
1 काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची गळफास घेऊन आत्महत्या
2 ‘कृष्णकुंज’बाहेर मनसैनिकांची उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी
3 सुरक्षित शहरांच्या यादीत मुंबई ४५ व्या स्थानी; टोकियो पहिल्या क्रमांकावर
Just Now!
X