News Flash

‘सुबोध’ गप्पांचा ‘भावे’ प्रयोग

१० जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता

संग्रहित छायाचित्र

लोकमान्य-एक युगपुरुष, बालगंधर्व, कटय़ार काळजात घुसली आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटांतील मुख्य व्यक्तिरेखा अभ्यासपूर्ण अभिनयाने अविस्मरणीय करणारे सुबोध भावे त्याच-त्या भूमिकांमध्ये अडकू न पडले नाहीत. ते सातत्याने विविधरंगी भूमिका साकारताना आणि नावीन्याचा शोध घेताना आढळतात. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ पुन्हा आणण्याचे ध्येय बाळगणाऱ्या या कलाकाराने लेखन आणि दिग्दर्शनातही स्वत:ला सिद्ध के ले. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास १० जुलैला संध्याकाळी ५ वाजता ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या वेबसंवादात अनुभवता येणार आहे.

पुण्यातील सिम्बॉयसिस महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर आयटी कं पनीतून सुरू झालेला त्याचा प्रवास आता मुंबईत येऊन अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरावला आहे. मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ परत आणण्याचा उद्देश मनात ठेवून पुढे जाणाऱ्या या कलाकाराने लेखन आणि दिग्दर्शनातही स्वत:ला सिद्ध केले. एकीकडे कलाकार म्हणून नव्या-जुन्या दिग्दर्शकांबरोबर काम करत असताना ‘अश्रूंची झाली फुले’, ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘स्थळ स्नेहमंदिर’, ‘कळा या लागल्या जीवा’ अशा नाटकांमधूनही त्याने काम केले.

दूरचित्रवाहिनीपासून काही काळ दूर राहून ‘तुला पाहते रे’ मालिकेतून परतलेल्या सुबोधने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. सातत्याने समाजमाध्यमांपासून चित्रपट माध्यमापर्यंत सर्जनशील प्रक्रियेशी स्वत:ला जोडून घेत कार्यरत असलेला सुबोध कलाकार म्हणून सामाजिक बांधिलकीही कायम जपत आला आहे. त्याच्या या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेणारा हा गप्पांचा भावे प्रयोग ‘सहज बोलता बोलता’ या कार्यक्रमातून रंगणार आहे.

कधी ? : १० जुलै रोजी संध्याकाळी ५ वाजता

सहभागी होण्यासाठी.. https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_10July या लिंकवर नोंदणी आवश्यक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:23 am

Web Title: subodh bhave in loksatta sahaj bolta bolta abn 97
Next Stories
1 मुंबईत करोनाबरोबरच डेंग्यूचाही धोका!
2 निकालाबाबत स्पष्टता नसल्याने ‘मिठीबाई’चे विद्यार्थी अस्वस्थ
3 आदिवासींच्या वनपट्टय़ांच्या अधिकाराचा प्रश्न तीन महिन्यांत निकाली काढा!
Just Now!
X