‘बिलिअरी अॅट्रेसिया’ या यकृताच्या आजाराने जन्मतः ग्रस्त असलेल्या एका ८ महिन्यांच्या बाळाला त्याच्या वडिलांनी आपल्या यकृताचा काही अंश दान केला व बाळाचा जीव वाचला. ‘कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल’मध्ये (केडीएएच) ही यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वीपणे पार पडली. हे बाळ आता सुखरूप आहे.

‘बिलिअरी अॅट्रेसिया’ या आजारात यकृतातून स्रवणाऱ्या पित्तरसाच्या प्रवाहात अडथळे येतात. त्यामुळे यकृत व त्याच्या पेशी खराब होतात. हा आजार अखेरच्या टप्प्यात असलेल्या बाळाला ‘केडीएएच’मध्ये दाखल करण्यात आले, तेव्हा त्याच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता निर्माण झालेली होती. यकृत निकामी झाल्याने रक्त गोठण्याची क्षमता या बाळामध्ये कमी झाली होती, तसेच त्याचे वजन अतिशय कमी झाले होते. अखेर तब्बल अकरा तास चाललेली ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. बाळ व त्याचे वडील या शस्त्रक्रियेतून बरे झाले आहेत. वडिलांना शस्त्रक्रियेनंतर ५ दिवसांनी, तर बाळाला १५ दिवसांनी घरी सोडण्यात आले.

बाळाच्या वडिलांनी आपल्या यकृताचा २५ टक्के भाग दान केला. तो बाळाच्या शरीरात बसविण्यात आला व रक्तवाहिन्यांना जोडण्यात आला. लहान बाळांमध्ये शस्त्रक्रियेनंतरची काळजी घेणे खूपच जिकिरीचे असते. ती ‘पेडियाट्रिक आयसीयू’मधील तज्ज्ञांच्या पथकाने व नंतर वॉर्डमधील पथकाने योग्य प्रकारे घेतली. मानवी यकृताचे पुनरुज्जीवन होऊन ते आपल्या मूळ आकारात येत असते; त्या अनुषंगाने बाळाच्या वडिलांचे यकृत अल्पावधीतच पुन्हा मूळ आकारात येईल व व्यवस्थित कार्य करू लागेल, अशी अपेक्षा आहे.”

ओजसचे वडील श्री. राऊळ कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, “कोकिलाबेन हॉस्पिटल’मधील डॉक्टर्स आणि संपूर्ण पथकाचा मी ऋणी आहे. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला व मोलाची मदत केली. ओजसला दाखल केल्यावर आणि प्रत्यारोपणामुळे त्याला वाचवता येईल याची खात्री डॉक्टरांनी दिल्यावर, आम्हाला नव्याने आशा वाटू लागली. उपचारांच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डॉक्टर व त्यांचे पथक आमच्यासोबत होते. ओजस पूर्णपणे बरा होईपर्यंत त्यांनी जे कष्ट घेतले, त्या त्यांच्या समर्पणाबद्दल मी अत्यंत आभारी आहे. आता यापुढे आमचे बाळ मोठे होईल व सामान्य आयुष्य जगू शकेल, अशी अपेक्षा आम्ही बाळगू शकतो. असं कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमधील हेड – लिव्हर ट्रान्सप्लांट डॉ. सोमनाथ चटोपाध्याय यांनी सांगितलं आहे.