05 December 2020

News Flash

डान्सरवर बलात्कार करून लाखोंच्या दागिन्यांसह पळ काढणाऱ्यास अटक

आरोपीचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याची माहिती

संग्रहीत

मुंबईत एका डान्सरवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून आणि सोने व हिऱ्याच्या ७७ लाखांच्या दागिन्यांची चोरी करून देश सोडून पळ काढण्याच्या तयारीत असलेल्या एका २९ वर्षीय आरोपीस सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे.

ओशिवारा पोलिसांनी या आरोपीची ओळख पटवली असून सलमान जुबेर परवीन असे त्याचे नाव आहे. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा सहकारी गँगस्टर तारीक परवीनचा तो भाचा असल्याचे समोर येत आहे.

पोलिसांनी याबद्दल माहिती देतांना सांगितले की, सलमान जुबेर परवीन हा पीडित महिलेस मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये एका पार्टीत भेटला होता. तेव्हा त्याने आपण वेब डेव्हलपर असल्याचे सांगितले होते. यानंतर ते एकमेकांच्या कायम संपर्कात राहत होते. महिलेने आरोपी केला आहे की, सलमाना यानेच तिच्या अपार्टमेंटची बनावट किल्ली बनवली व तिच्या तिजोरीतून दागिन्यांची चोरी केली आहे.

पीडित महिलेला ऑक्टोबर महिन्यापर्यंत याबाबत काहीच कल्पना नव्हती. मात्र, जेव्हा ती बंगळुरूवरून परतली, तेव्हा तिला घडलेला प्रकार समजला. यानंतर तिने पोलिसात तक्रार केली व आपला सलमानवर संशय असल्याचे तिने सांगितले. महिलेच्या तक्रारीवरून पोलीस सलमानचा शोध घेत होते, मात्र तोपर्यंत त्याने त्याचे सर्व सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक व फोन बंद केलेला होता. याच दरम्यान सलमान परवीन हा पुन्हा त्या महिलेला भेटला व तिच्याशी लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्यावर त्याने बलात्कार केला.

यानंतर पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी आरोपीस तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले व पोलिसांनी त्याला जयपूरमध्ये पकडले. पोलिसांनी सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली होती की त्याने अशाच प्रकारे बंगळुरूमध्येही गुन्हा केलेला आहे व तो दुबईला पळून जाण्याच्या तयारीत आहे. अखेर आम्ही त्याला देश सोडून जाण्याअगोदर पकडले. यावेळी त्याच्याकडून ६६ लाख रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात यश आले. सध्या तो तुरूंगात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 9:10 am

Web Title: the police arrested man for allegedly raping an artist dancer and stealing ornaments worth rs 77 lakh msr 87
Next Stories
1 दिवाळीच्या उत्साहामुळे कोंडी
2 सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू
3 शहरबात : बोनसचे वारे..
Just Now!
X