News Flash

काळा घोडा महोत्सवासाठी वाहतूक बदल

या निमित्ताने के. दुभाष मार्ग, शहीद भगतसिंह मार्ग येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

फोर्ट भागातील काळा घोडा परिसरात ६ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत साहित्य, कला, संस्कृती यांचा मिलाफ असलेल्या ‘काळा घोडा’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने के. दुभाष मार्ग, शहीद भगतसिंह मार्ग (एशियाटिक सोसायटीसमंोरील रस्ता) येथील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. के. दुभाष मार्ग, महात्मा गांधी मार्ग जंक्शन (काळा घोडा) ऱ्हिदम हाऊसपासून शहीद भगतसिंह मार्ग जंक्शन (लायन गेट) या मार्गावर आपत्कालीन सेवेतील वाहने सोडून अन्य वाहनांना प्रवेश बंदी आहे. हुतात्मा चौक येथून जाणारी वाहने काळा घोडा जंक्शन येथून सरळ मार्गाने जाऊन रिगल जंक्शन येथून डावे वळण घेऊन शहीद भगतसिंहमार्गे पुढे जातील. शहीद भगतसिंह मार्गावरील एशियाटिक सोसायटीसमोरील मार्ग १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते रात्री १० या वेळेत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. शहीद भगतसिंह मार्ग येथून येणारी वाहने बॅलॉर्ड पिअर जंक्शन येथे उजवे वळण घेऊन सर. पी.एम. मार्गावरून पुढे जातील तर शहीद भगतसिंह मार्ग (उत्तर वाहिनी) येथून येणारी वाहने हॉर्निमल सर्कल येथे डावे वळण घेऊन हॉर्निमल सर्कलला वळसा घालून डावे वळण घेतील आणि शहीद भगतसिंह मार्गावर येऊन पुढे रवाना होतील.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2016 12:34 am

Web Title: traffic changes for kala ghoda festival
Next Stories
1 राज्य शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार जाहीर
2 विक्रोळीत सिलेंडर स्फोटात एकाच घरातील तिघांचा मृत्यू
3 राज्यातील २ लाख मच्छिमारांना दिलासा
Just Now!
X