21 September 2020

News Flash

टीव्ही अभिनेता समीर शर्माने केली आत्महत्या

मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या

टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ४४ वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.

मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाइट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

“आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याता आला आहे”, अशी माहिती मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी जॉर्ज फर्नांडिस यांनी ‘मिड डे’ला दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:48 pm

Web Title: tv actor sameer sharma ends life at malad home ssv 92
Next Stories
1 “आयुष्यात पहिल्यांदाच पाहतोय,” दक्षिण मुंबईत साचलेलं पावसाचं पाणी पाहून शरद पवार आश्चर्यचकित
2 मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, पेडर रोड येथे भूस्खलन
3 मुंबईत मुसळ’धार’; मोडला ४६ वर्षांचा विक्रम
Just Now!
X