News Flash

पोलिस हवालदाराच्या हत्येप्रकरणी दोन गुंडांना अटक

मणिपुरी येथे पोलीस हवालदाराची हत्या करून मुंबईत पळून आलेल्या दोन गुंडांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड परिसरातून अटक केली. ऋषिकेश राजपूत

| April 21, 2013 02:59 am

मणिपुरी येथे पोलीस हवालदाराची हत्या करून मुंबईत पळून आलेल्या दोन गुंडांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड परिसरातून अटक केली. ऋषिकेश राजपूत आणि चंद्रकुमार राजपूत अशी या आरोपींची नावे असून दोघेही सख्खे भाऊ आहेत. दोन वर्षांपूर्वी मणिपुरी पोलिसांनी हत्ये प्रकरणी या दोघांना अटक केली होती. मात्र गेल्या ३१ जानेवारी रोजी दोघांनी न्यायालयाच्या आवारातच पोलीस हवालदार अजय यादव यांची हत्या करून पलायन केले. गेल्या दोन महिन्यांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. हवालदाराची हत्या केल्यानंतर हे दोघे मुंबईला पळून आले होते. गेला महिनाभर ते मुंबईतील लल्लूभाई कंपाऊंडमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या आधारे गुन्हे अन्वेषण विभाग आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करुन या दोघांना अटक केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2013 2:59 am

Web Title: two rowdy arrasted in police constable murder case
Next Stories
1 एलबीटीविरोधात ठाण्यातील व्यापाऱ्यांचा उद्या बंद
2 शरणागती न पत्करणाऱ्या आरोपीविरुद्ध ‘टाडा’ न्यायालयाचे अटक वॉरंट
3 मैदानासाठी आरक्षित भूखंडावर गाळे बांधले
Just Now!
X