26 September 2020

News Flash

मुले चोरण्याच्या वेगवेगळ्या घटनांत दोन महिलांना अटक

मुंबईत मुले पळवण्याच्या दोन घटनांमध्ये दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथून लहान मुलाला पळवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी पकडले,

| March 3, 2015 02:51 am

मुंबईत मुले पळवण्याच्या दोन घटनांमध्ये दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथून लहान मुलाला पळवणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी पकडले, तर एका मुलीला पळवून तिच्यासह भीक मागणाऱ्या एका तरुणीला अंधेरी स्थानकात अटक करण्यात आली.
नागपाडा परिसरात शनिवारी दुपारी एक बुरखाधारी महिला एका चार वर्षांच्या मुलाला उचलून पळ काढण्याचा प्रयत्न केला. इतर मुलांनी आरडाओरडा करताच स्थानिकांनी तिला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. जैनमबी नबी जुलमंडल (४५) असे या महिलेचे नाव असून ती पश्चिम बंगालची असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसऱ्या घटनेत अंधेरी स्थानकात भीक मागत असलेल्या एका तरुणीकडे असलेली दीड वर्षांची मुलगी पाहून एका नागरिकाने वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई अयुब इनामदार यांना सांगितले. इनामदार यांनी या तरुणीला जाब विचारताच तिने या मुलीचे अपहरण केल्याचे कबूल केले. तिचे  नाव रिना यादव असून निर्मलनगर पोलिसांनी तिला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 2:51 am

Web Title: two women arrested in children stolen cases
Next Stories
1 निरुपम यांच्याकडून वाढीव चटईक्षेत्राचे समर्थन
2 अवकाळी पाऊस मदतीबाबत आज चर्चा
3 राजन वेळुकर राज्यपालांना भेटणार
Just Now!
X