13 December 2017

News Flash

नवी मुंबईमध्ये बिल्डरची गोळ्या घालून हत्या

नवी मुंबईतील वाशीमध्ये एस. के. बिल्डर्सचे मालक सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोऱांनी

मुंबई - | Updated: February 16, 2013 12:37 PM

नवी मुंबईतील वाशीमध्ये एस. के. बिल्डर्सचे मालक सुनील कुमार यांची शनिवारी सकाळी अज्ञात हल्लेखोऱांनी गोळ्या घालून हत्या केली. सुरक्षारक्षकाच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांनी सुनील कुमार यांच्यावर त्यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडल्या. त्यांच्यावर एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी सुनील कुमार यांना पाच गोळ्या लागल्या. 
हल्लेखोरांकडे रिव्हॉल्वर आणि चॉपर होते. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी सुरुवातीला सुनीलकुमार यांच्या डोक्यावर शहाळे फेकले. त्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. कुमार यांना तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी एका हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे.
(संग्रहित छायाचित्र) 

First Published on February 16, 2013 12:37 pm

Web Title: unidentified persons shoots builder in navi mumbai