युद्धशताब्दीचे विविध रंग
दुसऱ्या महायुद्धाच्या शताब्दी वर्षांनिमित्ताने समीर कर्वे, अभिजित रणदिवे आणि सुप्रिया सहस्रबुद्धे यांनी वेगवेगळ्या माध्यमांच्या आढाव्याद्वारे तीन विशेष लेख सादर केले आहेत. दहशतवाद्यांनी जाहीररीत्या ठार dmकेलेल्या पत्रकार डॅनियल पर्ल यांच्या शेवटच्या वृत्तलेख आणि गेल्या वर्षी साहित्याचे नोबेल मिळविणाऱ्या कॅनडियन लेखिका अ‍ॅलिस मन्रो यांच्या कसदार कथेचा अनुवाद वाचायला मिळतो. पुस्तकप्रेमाच्या आणि पुस्तकवेडाच्या विविधाअवस्था रंगविणारे तरुण लेखक नितिन रिंढे यांनी हिटलरच्या पुस्तकप्रेमाची कथा सादर केली आहे. कोकणातील प्रकल्प आणि राजकारण यांच्यावर चपखल कादंबरी लिहिणारे प्रवीण दशरथ बांदेकर यांनी कोकणवासीयांचे प्रकल्पबाधित होण्याच्या प्रक्रियेचे सुरेख विश्लेषण केले आहे. हीप हॉप संगीतावर डॉ. आशुतोष जावडेकर यांचा लेख खूप माहितीपूर्ण आणि रसदार झाला आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजवटीची दिशा कशी असेल याबाबत अंदाज व्यक्त करणारा प्रकाश बाळ यांचा लेख आवर्जून वाचावा असा आहे.
वसा, संपादक, प्रभाकर नारकर, पाने २००, किंमत १०० रुपये.

सिंधी साहित्याचा वेध
दरवर्षी आपल्याला अज्ञात असलेल्या भाषेतील साहित्याला मराठीत घेऊन येणारा आकंठचा अंक हा संग्राह्य़ गटात मोडणारा असतो. हिंदी खूप कळणारी भाषा असली, तरी आपण त्या साहित्यापासून लांब असतो. इतर dm01भाषांबाबत ही उदासीनता अधिक असते. यंदा आकंठने सिंधी भाषेतील साहित्याचा खजिना उपलब्ध करून दिलेला आहे. डॉ. राम पंडित यांनी सिंधी लोक आणि संस्कृती यांचे विवेचन केले आहे. तर सिंधी कथा साहित्याची वाटचाल कशी झाली इथपासून ते कमलेश्वर यांनी लिहिलेल्या सिंधी साहित्यावरील लेखाचा थेट अनुवाद येथे वाचायला मिळतो. कथा विभागात गेल्या शतकातील सर्वोत्तम दोन डझनांहून अधिक कथांची मौज वाचकांना लुटता येणार आहे. सिंधी नाटक आणि कवितांचाही भाग यात देण्यात आला आहे. एकूण भारतीय भाषा अभ्यासकांसाठी आणि चांगल्या वाचकांसाठी पुरेपूर खाद्य आकंठने यंदाही दिले आहे.
आकंठ, संपादक, रंगनाथ चोरमुले, पृष्ठे २०२ किंमत १०० रुपये.

सबकुछ नेमाडे
भालचंद्र नेमाडेंवर विशेष विभाग करणारा विशाखाचा यंदाचा अंक बाजारात येण्यापूर्वीपासून मोठे कुतूहल राखून होता. आज ५० वर्षांनंतरही नेमाने नेमाडे वाचणारे, नेमाडपंथी साहित्य बनवणारे आणि ‘नेमाडे’पंची dm02करणारे यांची संख्या साहित्य विश्वात मोठी आहे. या सर्वाना भरगच्च तृप्ती देणाऱ्या लेखांची माळ विशाखाने गुंफली आहे. संजय भास्कर जोशी यांनी वेगळ्या ढंगातच नेमाडेंचे शब्दचित्र काढले आहेत. द. भि. कुळकर्णी, रविप्रकाश कुळकर्णी, किशोर सानप, माधवी देसाई, चंद्रकांत पांढरीपांडे, अशोक बाबर आणि कैक डॉक्टर आणि प्राध्यापकांनी नेमाडेंच्या साहित्य आणि व्यक्तिरेखेला शब्दरांगोळ्यांतून सजविले आहे. बाबा कदम यांचे सुपूत्र उमेश कदम यांनी गेल्या काही वर्षांमध्ये मोलाची साहित्य संपदा तयार केली आहे. विविध देशांमध्ये उच्चपद भूषविणाऱ्या उमेश कदम यांच्या आंतरराष्ट्रीय वातावरणातील कादंबऱ्यांविषयी अनंत मनोहर यांनी उत्तम लेख लिहिला आहे. शिवराज गोर्ले आणि दिलीप पाटील यांचे लेख, ह. मो. मराठे, मधु मंगेश कर्णीक आणि रवींद्र शोभणे यांच्या कथा असा बराज ऐवज असला, तरी हा अंक नेमाडेंच्या अभ्यासकांना मेजवानी आहे.
विशाखा, संपादक, ह. ल. निपुणगे, पृष्ठे, १९२, किंमत १५०.

विनोदाचा काठोकाठ प्याला
प्रत्येक अंकात विनोदासाठी विशिष्ट स्थान असते आणि आता अनेक अंक विनोदाला वाहिलेले निघतात. पण युनिक फिचर्सच्या ‘कॉमेडी कट्टा’ या अंकाचे वेगळेपण त्यांच्या इतर अंकांसारखेच हटके असते. ‘विनोदाचा dm03टँकर आलाय काठोकाठ भरून घ्या’ या हसऱ्या मुखपृष्ठातूनच आतमधील हास्यद्रवाचा अंदाज करता येतो. बब्रुवान रुद्रकंठावार, श्रीकांत बोजेवार, मुकेश माचकर आणि विसोबा खेचर यांच्या खास विनोदी कथा गमतीचा बार उडविणाऱ्या आहेत. ‘रफील ता आशा की शोरके तराने’ या कल्पक संकल्पनेद्वारे विसोबा खेचर यांनी मांडलेली भविष्यातील काल्पनिका आणि श्रीकांत बोजेवार यांची एका कवितेचा खटला रंगवत कवी, साहित्य समीक्षा आणि आजची कविता यांच्या उडविलेल्या टोप्या विलक्षण आहेत. प्रशांत कुलकर्णी यांच्या व्यंगचित्रमालिका आणि मधुकर धर्मापुरीकर यांच्या व्यंगचित्रकथा उद्बोधक आहेत. आमची चित्रं, आमची निवड या लेखमालेद्वारे अभिमन्यू कुलकर्णी, प्रभाकर वाईरकर आणि अनिल डांगे यांच्या लेखनाची खुबी पाहायला मिळेल. मिरासदारांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि चिं. वि. जोशी यांची माझे दत्तक वडील या ऑल टाइम हीट विनोदी कथांचे पुनर्मुद्रण आहे, तसेच आणखी अनेक विनोदी लेखांची गंमाडीजंमत आहे.
कॉमेडी कट्टा, सुहास कुलकणी, आनंद अवधानी, पृष्ठे-१३६. किंमत-१०० रुपये.

बालकथांपासून बालनाटय़पर्यंत सर्व काही
आठ कथा, साहसी तसेच शांतताप्रिय व्यक्तींची चरित्रं, कविता, उत्तम पुस्तकांची ओळख, पडद्यावरची लहान मुलं यांच्याविषयी लेख, कोडं, चित्रकथा याबरोबरच मुलांसाठी निर्मिती केलेला ‘खेळगडी’चा अंक. श्रुती dm04कार्लेकर, अथर्व कर्वे या दोन छोटय़ा बालदोस्तांची आणि बालकलाकारांची ओळख प्रकाश पारखी यांनी या अंकात करून दिली आहे.  डॉ. विजया वाड यांची ‘माझ्या आईची ष्टोरी’ राजीव तांबे यांची ‘फराळ’, डॉ.मंदा खांडगे यांची ‘बाबाची फजिती’, प्रा. सुहास बारटक्के यांची ‘बांधामधला धामण’, डॉ. लीला दीक्षित यांची ‘मोमीन आणि पंचकडी’, महावीर जोंधळे यांची ‘सूर्य बुडायच्या आत’, माधव राजगुरू यांची ‘म्हणजे काय हो बाबा..?’ सुभाष विभुते यांची ‘गोष्ट राखोळी रंग्याची’ या कथांचा समावेश या अंकात आहे.  
खेळगडी, संपादक-मानसी हजेरी, मूल्य- १०० रुपये

राजकीय अन् सांस्कृतिक फराळ
राजकीय मुखपृष्ठ असलेल्या सामन्याने दिवाळी अंकाच्या माध्यमातून सांस्कृतिक फराळ पुरवला आहे. घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने यू.म.पठाण यांनी शोध : संत dm05नामदेवांच्या मूळ अभंग गाथेचा हा अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे. सुनीता जोशी यांची ‘मुसलमान’ नावाची कथा रंजक आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या कुंचल्यातून साकारलेली तेंडुलकरी ही व्यंगचित्रांची मालिका वाचकांना हास्यरूपी टॉनिक देणारी आहे. बदला जमाना, बाबू बदला जमाना या लेखात शिरीष कणेकरांनी चित्रपटसृष्टीतील संक्रमणाचा वेध घेतला आहे.  लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांच्या आत्मचरित्रातील गिरणगाव हा भाग तत्कालीन संस्कृतीची माहिती करून देणारा आहे.
सामना, संपादक- उद्धव ठाकरे, पृष्ठे- १३६, मूल्य- ७०  

पत्रकारांचे रसरशीत साहित्य
साहित्य चपराकचा यंदाचा दिवाळी अंक वेगवेगळ्या विषयांवर माहिती देणारा आहे. जास्त लेख हे श्रमिक पत्रकारांचे असल्याने त्यात थोडा रसरशीतपणाही आहे. शिवचरित्र कथनाची शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे dm06यांनी सांगितलेली कथा वाचनीय आहे, प्रा. मििलद जोशी यांनी त्याला शब्दरूप दिले आहे. नरेंद्र मोदींचे परराष्ट्र धोरण हा डॉ. श्रीपाल सबनीस यांचा लेख, विकासावर वेगळे मुद्दे उपस्थित करणारा प्रदीप नणंदकर यांचा लेख, माळीण दुर्घटनेवर प्रशांत चव्हाण यांचा लेख, शरद पवार यांच्या व्यक्तिमत्त्वातील खुब्या टिपणारा पत्रकार अरुण खोरे यांचा लेख, कविता, व्यंगचित्रे व विनोद ही या अंकाची काही वैशिष्टय़े आहेत.
साहित्य चपराक- संपादक- घनश्याम पाटील, पृष्ठे-१९४, किंमत- १३० रुपये

मुलांच्या जडणघडणीत मार्गदर्शक
लोणावळ्यातील ‘मनशक्ती’ने बालदोस्तांसाठी पहिलाच विशेष दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या आईवर लिहिलेला ‘जिद्दीचा दीपस्तंभ-माझी आई’ या लेखापासून अंकाला सुरुवात dm07होते. आपल्या जडणघडणीचे श्रेय आईला देत असताना त्यांचा आईबरोबर असलेला संवाद कसा होता, याविषयी लिहिले आहे. खेडेगावात घडलेले शि.द.फडणीस यांना मिळालेल्या पहिल्या शाबासकीतून ते कसे घडले, या विषयी वाचायला मिळते. जयंत नारळीकर यांच्या मामांनी त्यांना घातलेले आव्हानात्मक प्रश्न आणि नारळीकरांनी या आव्हानात्मक प्रश्नांची उत्तरे दिल्यामुळे काय घडलं ते ‘रँग्लरीचे आव्हान’या लेखात मांडलं आहे.  
मनशक्ती बालदोस्तांसाठी, अतिथी संपादक- प्रवीण दवणे, मूल्य- २५ रुपये