लोखंडवाला येथिल एका वकिल महिलेला डेबिट कार्डच्या क्लोनिंगद्वारे ६२ हजार रूपयांना गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे या वकिलाच्या खात्यातील पैसे अमेरिकेतून काढण्यात आले आहेत.

या महिलेच्या तक्ररीनुसार ही महिला आपल्या घरात असताना १ जून रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास तिला आपल्या मोबाईलवर पैसे काढण्यात आल्याचा मेसेज आला. मध्यरात्रीची वेळ असल्याने ही महिला दुसऱ्या दिवशी सकाळी बॅंकेच्या शाखेत गेली आणि तीने आपल्या खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे बॅंक अधिकाऱ्यांना सांगितले. यावर बॅंकेने हे पैसे अमेरिकेतून काढण्यात आल्याची माहिती महिलेला दिली. त्यानंतर बॅंकेच्या सुचनेनुसार, या महिलेने स्थानिक पोलिस स्थानकांत तक्रार दिली. यावेळी पोलिसांनी सायबर पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सायबर सेलने काही दिवसांपूर्वी एक बनावट डेबिट कार्डचे रॅकेट उद्धस्त केले. यामध्ये एका बल्गेरिअन व्यक्तीला पकडले होते. या व्यक्तीला भारतातून एका चीनी व्यक्तीच्या खात्यातील पैसे काढताना पकडण्यात आले होते. यासाठी चीनी नागरिकाच्या डेबिट कार्डची माहिती माहिती चोरून या माहितीच्या आधारे क्लोन कार्ड बनवण्यात आले होते. त्यानंतर या कार्डचा वापर करून या बल्गेरिअन व्यक्तीने मुंबईतील आंतरराष्ट्रीय बॅंकेतून पैसे काढले होते.

याप्रकरणी, सायबर एक्सपर्ट अॅड. विकी शाह यांनी सांगितले, जर एखादे डेबिट कार्ड हे इंटरनॅशनली इनेबल्ड असेल तर तरच केवळ एकदाच या कार्डवरून जगात कोठूनही पैसे काढता येतात. अशाप्रकारे मुंबईतील या वकिल महिलेचे डेबिट कार्ड हे इंटरनॅशनली इनेबल्ड असल्याने त्याचे चोरट्याना क्लोनिंग करता आले. अशी कार्डसमध्ये चुंबकीय पट्टी आणि इव्हीएम चीप बसवलेल्या असतात. यांपैकी इव्हीएम चीप असलेल्या कार्डसचे क्लोनिंग करणे जास्त अवघड असते. त्यामुळे आता आपल्या बॅंक खात्याचे कार्ड वापरणाऱ्यांनी चुंबकीय पट्टीसह असलेले कार्ड बदलून इव्हीएम चीप असलेले कार्ड घ्यायला हवे.
[jwplayer FBtHyZyD]