सूनील बर्वे यांच्या संकल्पनेतून ‘ऑनलाइन माझं थिएटर’

मुंबई : एरव्ही दूरचित्रवाहिनीवरील एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमधून आमने-सामने येणाऱ्या कलाकारांना ऑनलाइन स्पर्धेच्या रिंगणात उतरवून एक आगळावेगळा मनोरंजक कार्यक्रम सादर करण्यात येत आहे. ‘ऑनलाइन माझं थिएटर’ या अनोख्या स्पर्धेत सध्या २० कलाकार सहभागी झाले आहेत. चार संघ, त्यांचे प्रमुख आणि त्यांच्यात सुरू असलेली सादरीकरणाची स्पर्धा असे या कार्यक्रमाचे वेगळे स्वरूप आहे.

टाळेबंदीच्या काळात कलाकारांच्या मुलाखती, गाण्या-कवितांचे कार्यक्र म करण्यात आले. नंतर तर मुलाखतीही एकसुरी झाल्या. तेव्हा या कलाकारांना घेऊन स्पर्धात्मक कार्यक्रम करण्याचा विचार मनात आला. त्यातूनच ‘ऑनलाइन माझं थिएटर’ हा स्पर्धात्मक कार्यक्रम आकाराला आल्याचे अभिनेते सुनील बर्वे यांनी सांगितले. संदीप पाठक, संकर्षण कऱ्हाडे, रसिका आगाशे आणि मिलिंद फाटक असे या चार संघांचे संघप्रमुख आहेत. त्यांच्यात सादरीकरणाची स्पर्धा असेल. प्रत्येक फे रीत दोन संघांमध्ये स्पर्धा होईल. प्रत्येक संघामधील कलाकार त्यांना आठवडाभर आधी दिलेल्या विषयावर वाचिक, आंगिक अभिनय, गायन, नृत्य, मूकनाटय़ किं वा अभिवाचनावर आधारित एकपात्री सादरीकरण करतील. त्याचे परीक्षण दिग्दर्शक चंद्रकांत कु लकर्णी, अभिनेत्री वंदना गुप्ते आणि अश्विनी भावे करणार आहेत. सहा फे ऱ्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळवून जिंकणाऱ्या संघाला लाख रुपयाचे पारितोषिक तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला ७५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येईल.

कार्यक्रम प्रेक्षकांना तिकीट खरेदी करून पाहता येईल. प्रेक्षकांना सादरीकरण पाहून त्या त्या संघाला गुणही देता येतील. प्रेक्षकांकडून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांना २५ हजार रुपयांचा प्रेक्षक पसंती पुरस्कार देण्यात येईल. मराठी नाटक-मालिका-चित्रपटक्षेत्रातील प्रिया मराठे, हेमांगी कवी, ऋतुजा बागवे, आरती मोरे, नंदिता धुरी, शुभंकर तावडे, भार्गवी चिरमुले, ऋतुराज शिंदे, आशुतोष गोखले, नेहा शितोळे, विकास पाटील, आरोह वेलणकर, गौरी नलावडे, सुनील अभ्यंकर आणि नचिके त देवस्थळी अशा कलाकारांचा स्पर्धेत सहभाग आहे. स्पर्धेच्या दोन फे ऱ्या पार पडल्या असून १८ आणि १९ जुलैला पुढची फेरी होईल, तर २५ आणि २६ जुलैला अंतिम सामना होईल. कलाकार घरीच राहून झूम अ‍ॅपद्वारे ही स्पर्धा रंगतदार करणार असल्याचे बर्वे यांनी सांगितले.

अंतिम सामना

सध्या या स्पर्धेच्या दोन फे ऱ्या पार पडल्या असून १८ आणि १९ जुलैला पुढची फे री होईल. तर २५ आणि २६ जुलैला अंतिम सामना होणार आहे. सगळे आपापल्या घरीच राहून झूम अ‍ॅपद्वारे ही स्पर्धा रंगतदार करणार असल्याचे सुनील बर्वे यांनी सांगितले.