Premium

दलालांच्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर, परीक्षा देणारे ८९ टक्के उमेदवार पात्र

स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांच्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला एकूण ४९५४ उमेदवार बसले होते, त्यापैकी ४४६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.

3rd exam result of brokers announced, 89 percent candidates qualified
महारेराने दलालांसाठी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.(फोटो- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : स्थावर संपदा क्षेत्रातील दलालांच्या तिसऱ्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेला एकूण ४९५४ उमेदवार बसले होते, त्यापैकी ४४६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल ८९ टक्के लागला आहे. तीन परीक्षा मिळून आतापर्यंत ७६७८ उमेदवार दलाल म्हणून पात्र ठरले आहेत.

रेरा कायद्यानुसार विकासकांबरोबरच स्थावर संपदा क्षेत्राततील दलालांनाही महारेरा नोंदणी बंधनकारक आहे. त्यापुढे जाऊन महारेराने दलालांसाठी प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. त्यासाठी महारेराने प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र परीक्षा सुरु केल्या आहेत. त्यानुसार नुकतीच दलालांची तिसरी परीक्षा झाली. त्या परीक्षेला ४९५४ उमेदवार बसले होते. त्यापैकी ४४६१ यशस्वी झाले. त्यात ३८०३ पुरूष आणि ६५८ महिलांचा समावेश आहे. त्यातील २०० उमेदवार ज्येष्ठ नागरिक असून १० उमेदवारांनी सत्तरी ओलांडलेली आहे. तर दोन जण ८० वर्षांच्यावर आहेत. नागपूरचे एक उमेदवार तब्बल ८५ वर्षांचे आणि दुसरे पुण्याचे उमेदवार ८३ वर्षांचे आहेत.

आणखी वाचा-मुंबई महानगरपालिका रुग्णालयात भूमिगत कचरपेट्या बसवणार

या निकालात मुंबईच्या पल्लवी उपाध्याय, ठाण्याचे अनिलकुमार खंडेलवाल आणि रायगडचे सनी दुग्गल या तिघांनी ९८ टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे. दरम्यान पहिल्या परीक्षेचा निकाल ९६ टक्के, दुसर्‍या परीक्षेच्या निकाल ९३ टक्के तर तिसऱ्या परीक्षेचा निकाल ८९ टक्के लागला आहे. तिन्ही परीक्षांमधून आतापर्यंत ७६७८ उमेदवार दलाल म्हणून पात्र ठरले आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 3rd exam result of brokers announced 89 percent candidates qualified mumbai print news mrj

First published on: 07-12-2023 at 12:48 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा