मुंबई : मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने मानसिक नैराश्यातून एका चौदा वर्षांच्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात मंगळवारी घडली. घरात कोणीही नसताना लोखंडी सळीला गळफास घेऊन तिने जीवन संपवले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून तिच्या पालकांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसभा निवडणूक २०१९ निकाल

मालवणी येथील खारोडी परिसरात मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. या परिसरात मृत चौदा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसह राहत होती. मंगळवारी सायंकाळी तिने तिच्या राहत्या घरातील लोखंडी सळीला गळफास लावून आत्महत्या केली होती. हा प्रकार तिच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत कांदिवलीतील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. सायंकाळी सव्वासात वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिच्या पालकांची पोलिसांनी जबाब नोंदवून घेतली होती. या जबाबात या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. या पाळीचा तिला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने गळफास लावून आत्महत्या केली असावी अशी शंका व्यक्त केली आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation mumbai print news amy
First published on: 27-03-2024 at 22:01 IST