परिपत्रकांबाबत नगरसेवकांचा आक्षेप; छोटय़ा व्यावसायिकांसाठी मराठी भाषेतील माहितीचा आग्रह

मुंबई : मुंबई महापालिकेचा कारभार मराठी भाषेत असावा असा दंडक असतानाही करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून जारी करण्यात येणारी परिपत्रके, तसेच मुंबईत ठिकठिकाणी झळकवलेली जाहिरातींच्या फलकांवर इंग्रजी भाषेत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत शिवसेनेच्या नगरसेवकाने आक्षेप नोंदवत राज्याचे मुख्य सचिव आणि मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून मराठी भाषेतील जाहिरात फलक लावण्याची विनंती केली आहे.

Maharashtra Din 2024 Wishes in Marathi
Maharashtra Day Wishes: महाराष्ट्र दिनाच्या व मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा पाठवून गाऊ गाथा गौरवाची, पाहा शुभेच्छापत्रांची यादी
hindostan hamara marathi news, hindostan hamara book
राष्ट्रवादी लोककवितेचा बुलंद उद्गार
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
The order issued by Reserve Bank in February 2013 regarding private banks
अन्यथा: अनुलेखांचं औदार्य!

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली असून ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून मुंबईत ठिकठिकाणी जाहिरात फलकांच्या माध्यमातून करोनाविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच करोनाची बाधा होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, काय करू नये याचीही माहिती जाहिरात फलकांवर झळकविण्यात आली आहे. मात्र जाहिरात फलकांवर इंग्रजी भाषेत माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर करोनाविषयी पालिका प्रशासनाकडून दररोज परिपत्रके जारी करण्यात येत आहेत. ही परिपत्रकेही इंग्रजी भाषेतच जारी करण्यात येत आहेत. शिवसेनेचे नामनिर्देशीत नगरसेवक अरविंद भोसले यांनी त्यास आक्षेप घेतला आहे.

करोनाविषयक जाहिराती आणि परिपत्रक सहज सोप्या मराठी भाषेत जारी करावे. त्यामुळे नागरिकांना कोणत्या उपाययोजना कराव्या हे सहज समजू शकेल आणि करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मदत होऊल, असे पत्र अरविंद भोसले यांनी राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता आणि पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांना पाठविले आहे.