scorecardresearch

माजी आमदार अ‍ॅनी शेखर यांचे निधन

मम्मी नावाने परिचित असलेल्या शेखर  कुलाब्यातून दोनदा महापालिकेवर निवडून आल्या होत्या.

माजी आमदार अ‍ॅनी शेखर यांचे निधन
काँग्रेसच्या कुलाब्याच्या माजी आमदार अ‍ॅनी शेखर (८४)  यांचे रविवारी निधन झाले.

मुंबई : काँग्रेसच्या कुलाब्याच्या माजी आमदार अ‍ॅनी शेखर (८४)  यांचे रविवारी निधन झाले. सिरियन ख्रिचन समाजाच्या शेखर या २००४ आणि २००९ मध्ये कुलाबा मतदारसंघातून विधानसभेत निवडून आल्या होत्या. मम्मी नावाने परिचित असलेल्या शेखर  कुलाब्यातून दोनदा महापालिकेवर निवडून आल्या होत्या.

कफ परेड, गीता नगर भागातील प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी पाठपुरावा करायच्या. कुलाबा परिसरातील उद्यानांमध्ये शाळकरी मुलांसाठी त्यांनी सुरू केलेल्या अभ्यासिकांचे कौतुक झाले होते. मंत्रालयाजवळील कुपरेज मैदानाजवळील उद्यानात शेखर यांनी उभारलेल्या अभ्यासिकेचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात गौरव झाला होता. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या