मुंबईत महिलेवर सामुहिक बलात्कार

मुंबईत सायन-माटुंगा रेल्वे रुळाजवळील झोपडीमध्ये राहणाऱया एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

मुंबईत सायन-माटुंगा रेल्वे रुळाजवळील झोपडीमध्ये राहणाऱया एका महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणातील आरोपींची नावे पोलिसांना समजली असून, पोलिस त्यांचा शोध घेताहेत.
शुक्रवारी रात्री दोघे जण संबंधित महिलेच्या घरात शिरले. त्यांनी तिच्या पतीला मारहाण करून त्याला घराबाहेर काढले. त्यानंतर त्यांनी तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरुवातीला दोन व्यक्ती घरात शिरल्या आणि नंतर आणखी पाच जण आल्याचा आरोप महिलेने केला. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात दोघांची नावे समजली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी मानखुर्द येथील झोपडपट्टीमध्ये पोलिस पथक पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी सुरुवातीला दादर रेल्वे पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर तो माटुंगा पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gangrape on women living in slum area near matunga