भिवंडीत दरड कोसळून मुलीचा मृत्यू

भिवंडी येथील नागाव गायत्रीनगर भागातील डोंगरावर वसलेल्या रामनगर झोपडपट्टीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली.

भिवंडी येथील नागाव गायत्रीनगर भागातील डोंगरावर वसलेल्या रामनगर झोपडपट्टीवर दरड कोसळून झालेल्या अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा मृत्यू तर आठ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत आठ झोपडय़ांचे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे गायत्रीनगर भागातील डोंगरावर वसलेल्या रामनगर येथील झोपडय़ांवर मंगळवारी दुपारी दरड कोसळली. त्यामध्ये सृष्टी प्रशांत इनामके या आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर राम मोर्या (४८), पुजा यादव (१३), सत्तार पठाण (४२), सुशील मोर्या (२८), कमला इनामके (२०), असे सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना भिवंडीतील इंदीरा गांधी उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Girl killed in landslide at bhiwandi