हार्बर मार्गावरील टिळकनगर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठप्प झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ओव्हरहेड वायरमधील बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. पनवेलहून मुंबईकडे येणा-या वाहतूकीला या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला होता. दरम्यान, मुंबईहून पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूकही धीम्यागतीनं सुरु आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या बिघाडामुळे मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे. रेल्वे एकाच जागी बराच वेळ खोळंबल्याने अनेक प्रवाशांनी खाली उतरून पायी चालत जाणे पसंत केले.
पनवेल-मुंबई वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
पनवेलहून मुंबईकडे येणा-या वाहतूकीला या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला होता.
Written by विश्वनाथ गरुड
First published on: 19-10-2015 at 12:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Harbour line services disturbed