बँकांकडे मोठय़ा संख्येने जमा होणाऱ्या पाचशे-हजारच्या नोटा मोजण्यासाठी आणि त्या तपासण्यासाठीच्या यंत्रांच्या मागणीतही वाढ झाली आहे.

देशातील काळे धन बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे-हजाराच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली. ज्यांच्याकडे या नोटा होत्या त्यांनी त्या बदलून घेण्यासाठी पोस्ट आणि बँकांसमोर रांगा लावल्या. या नोटा तपासून आणि मोजून घेण्याकरिता यंत्राचा वापर केला जातो. रिझव्‍‌र्ह बँकेसह सर्व बँकांच्या शाखा, पोस्ट कार्यालयात सुटे चलन मोजण्यासाठी यंत्रे लागतात. याखेरीज मॉल आणि इतर मोठय़ा प्रमाणात आíथक उलाढाल असलेल्या ठिकाणीही ती लागतात. नोटा रद्द झाल्यामुळे या यंत्रांना मागणी वाढली आहे. देशभरात गेल्या काही दिवसांत वीस हजारांपेक्षा जास्त संख्येने ही यंत्रे विकली गेल्याचा अंदाज या क्षेत्रातील प्रमुख उत्पादक आणि वितरक अल्बर्ट इंटरनॅशनल प्रा. लिमिटेडचे कार्यकारी संचालक व्हिक्टर सिक्वेरा यांनी ‘लोकसत्ता-मुंबई’शी बोलताना सांगितले. ही बहुतांश यंत्रे चीनकडून आयात केली जात असल्याची माहिती सिक्वेरा यांनी दिली. देशात पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनबंदीने नोटा मोजण्याच्या यंत्रांची मागणी सुमारे ४० टक्क्यांनी वाढली आहे. पॅकेजिंग काऊंटिंग आणि लूज काऊंटिंग मशीन्स असे मुख्य दोन प्रकार यात आहेत. बँकेत सुटय़ा नोटा मोजण्याबरोबरच त्यांचा अस्सलपणाही तपासला जातो. ही यंत्रे आयात करून त्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर भारतीय कंपन्या बनवितात. चलनाचा अस्सलपणा तपासण्यासाठी यंत्रात सेन्सर पोझिशन शिफ्ट करणे वा अ‍ॅड करण्याचे काम प्रामुख्याने केले जाते.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

लाखो रुपयांच्या नोटा मोजणे, त्या वेगवेगळ्या करणे, खराब नोटा वेगळ्या करणे, खोटय़ा नोटा तपासणे, नोटांची बंडले करणे आदी कामांसाठी ही यंत्रे उपयोगात आणली जातात. दरम्यान, सध्या नव्या नोटांचे एटीएममध्ये कॅलिब्रेशन करायला वेळ लागणार असून शेवटच्या माणसांपर्यंत नोटा पोहोचायला अजून दीड आठवडा तरी जाईल, अशी शक्यता सिक्वेरा यांनी बोलून दाखविली.