scorecardresearch

Premium

महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार, एसआयटी चौकशीची लोकलेखा समितीची शिफारस

राजधानी नवी दिल्लीत बांधण्यात आलेले महाराष्ट्र सदन, अंधेरी आरटीओ आणि हायमाऊंट गेस्ट हाऊस या बांधकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका राज्य विधीमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवला आहे.

महाराष्ट्र सदन बांधकामात गैरव्यवहार, एसआयटी चौकशीची लोकलेखा समितीची शिफारस

राजधानी नवी दिल्लीत बांधण्यात आलेले महाराष्ट्र सदन, अंधेरी आरटीओ आणि हायमाऊंट गेस्ट हाऊस या बांधकामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा ठपका राज्य विधीमंडळाच्या लोकलेखा समितीने ठेवला आहे. या संपूर्ण प्रकरणाची विशेष चौकशी पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची शिफारसही समितीने केली आहे. लोकलेखा समितीचे अध्यक्ष गिरीश बापट यांनी यासंदर्भातील अहवाल शुक्रवारी विधीमंडळात सादर केला. या अहवालामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यापुढील अडचणी वाढल्याचे चित्र आहे. भुजबळ यांना गुरुवारीच राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाशिकमधून उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र सदन, अंधेरी आरटीओ आणि हायमाऊंट गेस्ट हाऊस हे प्रकल्प उभारताना विकासकाला एसआरएचा भूखंड तसेच वाढीव टीडीआर देण्यात आला होता. या प्रकल्पात विकासकाला २० टक्के नफा अपेक्षित असताना सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱयांनी चुकीच्या पद्धतीने करार केल्याने त्याला तब्बल ५० टक्के नफा झाला आहे. या प्रकरणात बांधकाम विभागातील अधिकाऱयांची भूमिका संशयास्पद असून, त्यांची सखोल चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे.

Maharashtra State Backward Classes Commission the survey of Maratha community and open category citizens has started pune news
पुण्यात मराठा सर्वेक्षणाला वेग: ‘एवढ्या’ कुटुंबांची माहिती झाली संकलित
Manoj-Jarange on Survey
सरकारने जरांगेंच्या मागण्या मान्य केल्यानंतर आता सर्वेक्षण होणार की नाही? राज्य मागासवर्गीय आयोगाचं स्पष्टीकरण
maharashtra ats arrested many associated with isis terrorist organization in last few months
गुप्तचर विभागाकडील माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे!, राज्यातील एटीएस आता आत्मनिर्भर
Standard wise format fixed under free uniform scheme Pune news
मोफत गणवेश योजनेअंतर्गत इयत्तानिहाय स्वरुप निश्चित, कसा असणार गणवेश?

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Irregularities in construction of maharashtra sadan in new delhi

First published on: 28-02-2014 at 12:04 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

×