अशोक अडसूळ , सिद्धेश्वर डुकरे,लोकसत्ता

मुंबई : विरोधकांच्या ‘इंडियन नॅशनल डेव्हलमेंटल इन्क्लुझिव अलायन्स’च्या (इंडिया) बैठकीनिमित्त मुंबईत आगमन झालेल्या नेत्यांचे ग्रँड हयात हॉटेलमध्ये ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. नेतेमंडळींबरोबरच हॉटेलात प्रवेश मिळविण्यासाठी खासदार-आमदारांबरोबरच कार्यकर्त्यांचा झालेला प्रयत्न व त्यावरून सुरक्षा रक्षकांबरोबर बाचाबाचीचे प्रकार दिवसभर सुरू होते.

different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!

हॉटेलच्या प्रवेशद्वारी शिवसेना (ठाकरे गट) खासदार विनायक राऊत व प्रियांका चतुर्वेदी आलेल्या नेत्यांचे स्वागत करत होत्या. पार्लेश्वर मंडळाच्या ढोलताशा आणि तुतारीच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत होते. हॉटेलच्या दरवाजाला ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ अशा कमानी होत्या. वाकोला, कलिना परिसरातील फुटपाथ अन् चौक नेत्यांच्या स्वागताच्या फ्लेक्सने रंगले होते.

हेही वाचा >>> ‘इंडिया’ आघाडीच्या बिकट वाटेची माध्यमांत चर्चा

नेत्यांसोबत  आमदार, खासदार हॉटेलमध्ये प्रवेशासाठी धडपडत होते. सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांची बाचाबाची होत होती. अर्धा ताफा आत आणि आर्धा रस्त्यावर असे, त्यामुळे हॉटेलसमोर दिवसभर वाहतूक कोंडी होती.

राज्य पोलीस, परराज्यातील नेत्यांबरोबरची सुरक्षा आणि हॉटेलचे खासगी रक्षक  अशी तिहेरी सुरक्षा गेटवर तैनात होती.   

सकाळी सर्वप्रथम पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला पोहोचले. त्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हॉटेलवर पोहोचले होते. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. माकपचे सीताराम येचुरी, भाकपचे डी. राजा आणि द्रमुकचे नेते व तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन  यांचे आगमन झाले.

हेही वाचा >>> निवडणुकीच्या तयारीला लागा; ‘इंडिया’च्या नेत्यांचा सूर, संसदेच्या विशेष अधिवेशनामुळे विरोधक सावध  

राष्ट्रीय जनता दलाचे लालूप्रसाद, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी आणि लालू त्यांच्या कन्या मिसा यांच्यासह आले. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या तेजस्वी आणि मिसा यांच्याबरोबर हास्यविनोदात रमल्या होत्या. समाजवादी पक्षाचे अखिलेश हे पत्नी डिंपल यांच्यासह दाखल झाले. त्यांच्या ताफ्यातील पदाधिकाऱ्यांनी लाल टोप्या घातलेल्या होत्या. आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल यांच्या ताफ्यातील मोटारीवर पक्षाचे झेंडे होते.

‘बाळासाहेबांनी विरोध केलेल्या पक्षांपुढे उद्धव ठाकरे यांची लाचारी’

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर विरोध केलेल्या पक्षांपुढे उद्धव ठाकरे यांनी लाचारी पत्करली असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला. दीड दिवसाच्या या बैठकीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोपही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.  केवळ घराणेशाही जोपासण्यासाठी एकत्र आले असल्याची टीका खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली. सावरकर यांचा जाहीर अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांना ठाकरे माफी मागण्यास भाग पाडणार आहेत का, असा सवालही शिंदे गटाने केला. एकवेळ पक्ष विर्सजित करेन पण शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही अशा शब्दांत काँग्रेसचा समाचार घेणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेला तिलांजली देऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांबरोबर घरोबा केला आहे, असा आरोप केसरकर यांनी केला. इंडिया आघाडीचे नेते हॉटेल ग्रँड हयातमध्ये दाखल होत असताना त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते.