लेप्टोचा आणखी एक बळी

मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे एका ३१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसच्या बळींची संख्या १६ वर पोहोचली आहे.

मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे एका ३१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे लेप्टोस्पायरोसिसच्या बळींची संख्या १६ वर पोहोचली आहे. तसेच आणखी दोघांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून रुग्णांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. तर स्वाईन फ्लूमुळे रविवारी मुंबईत एकाचा मृत्यू झाला.
मालाड ते दहिसर परिसरातील १३ जणांचा लेप्टोमुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये समावेश असल्याने या भागातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. विक्रोली पार्क साईट परिसरातील संकल्प चाळीतील एका ३१ वर्षीय व्यक्तीचा लेप्टोमुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या १६ वर गेली आहे. तसेच रविवारी आणखी दोघांना लेप्टोस्पायरोसिस झाल्याचे निष्पन्न झाले असून मुंबईतील लेप्टोग्रस्तांची संख्या ४८ वर पोहोचली आहे. दरम्यान, काळाचौकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील रत्नागिरी चाळीतील ३४ वर्षीय रहिवाशाचा रविवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Letpo patients dead