Maharashtra Assembly Election 2019 Result:

शिवडीमध्ये भगवा फडकला असून या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी ४० हजार मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. त्यांनी मनसेचे उमेदवार संतोष नलावडे यांचा दारुण पराभव केला आहे.

bjp mukesh dalal unopposed win
Video: मतदानाआधीच भाजपानं पहिली जागा जिंकली; सूरत लोकसभा मतदारसंघात मुकेश दलाल विजयी, वाचा नेमकं काय घडलं…
Madha lok sabha constituency, election 2024, Dhangar community votes
माढा मतदारसंघात धनगर समाजाची मते निर्णायक
maval loksabha, shrirang barne
पिंपरी: मावळमध्ये उमेदवारांची दमछाक
Parrot
निवडणुकीत कोण जिंकणार? भाकित वर्तवल्याने पोपटावर पोलिसांची कारवाई; VIDEO व्हायरल!

परेल, लालबाग, काळाचौकी, घोडपदेव आणि लोअर परेलचा काही भाग या मतदारसंघात येतो. २००९ चा अपवाद वगळता ८० च्या दशकापासून या मतदारसंघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेनेने शिवडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी दिली होती.

परेल-लालबागच्या जनतेने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. पूर्वी या भागात गिरण्या मोठया प्रमाणात असल्याने हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जायचा. पण आता इथे अनेक बहुमजली टॉवर झाले आहेत, तरीही या भागामध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम आहे.

मनेसच्या बाळा नांदगावकरांनी २००९ साली शिवडी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण त्यांना मनसेसाठी मतदारसंघाची बांधणी करता आली नाही. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत त्यांना मनसेचा एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही. अखेर २०१४ विधानसभा निवडणुकीत अजय चौधरी यांनी त्यांचा पराभव केला. बाळा नांदगावकरांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजय चौधरी यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडे तुल्यबळ उमदेवार नव्हता.