सेवेत लवकरच अवघे ५४ कंत्राटी वाहक

Farmer's Anger, Unmet Demands, Kishore Tiwari, Impact Mahayuti, Maharashtra, lok sabha elections, lok sabha 2024, election 2024, yavatmal news, marathi news, politics news,
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा महायुतीला फटका, किशोर तिवारींचा दावा,’ ३० जागांवर…’
abhay daga upsc marathi news, abhay daga upsc latest marathi news
“नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीवरुन संपकऱ्यांनी अद्यापही माघार न घेतल्याने राज्यात एसटीची सेवा पूर्णपणे सुरु होऊ शकलेली नाही. संपात अद्यापही चालक आणि वाहकही मोठय़ा प्रमाणात सहभागी असल्याने एसटी महामंडळाने मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंत्राटी चालकांबरोबरच वाहकही भरण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अवघे ५४ कंत्राटी वाहकच सेवेत येण्याच्या तयारीत असून त्यांचे प्रशिक्षण सुरु असल्याची माहिती एसटीतील सूत्रांनी दिली.

संपामुळे राज्यातील एसटीची सेवा अद्यापही ठप्पच आहे. ८२ हजारपैकी ५४ हजार कर्मचारी अद्यापही संपात आहेत. यामध्ये ९ हजारपेक्षा जास्त चालक, वाहक सेवेत आले असून ४५ हजारपेक्षा जास्त चालक, वाहक संपात आहेत. त्यामुळे १६ हजार बसगाडय़ा असतानाही दिवसाला जेमतेम साडे तीन हजार बस धावत आहेत. त्याच्या दहा हजारफेऱ्या होतात. प्रवाशांचे हाल थांबवण्यासाठी महामंडळाने कंत्राटी चालक आणि वाहकही भरती करुन एसटी सुरु ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. सध्या १,७०० कंत्राटी चालक सेवेत असून एसटीत इलेक्ट्रॉनिक तिकीट इश्यू मशीन पुरवण्याचे कंत्राट दिलेल्या ट्रायमॅक्स कंपनीकडूनही वाहक उपलब्ध केले जाणार आहेत. या कंपनीकडून ५४ वाहकच मिळाले असून त्यांचे प्रशिक्षण सुरु आहे. ही संख्या आणखी वाढवण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न सुरु  आहेत.

अल्प प्रतिसाद

एसटीचे चालक, वाहक कामावर रुजू होणाऱ्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने संपकाळात वाहन परीक्षक, सहाय्यक वाहतुक निरीक्षक आणि यांत्रिकी कर्मचाऱ्यांवर चालकाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला होता. तर वाहतूक नियंत्रकांवर वाहकाची जबाबदारी देण्यात येणार होती. परंतु त्यालाही अल्पच प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगण्यात  आले.