मुंबई : ‘मॅकडोनॉल्ड’ या साखळी रेस्तराँमध्ये प्रत्यक्ष ‘चीज’ न वापरता ‘चीज’सदृश्य पदार्थांचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत अन्न व सुरक्षा आयुक्तांनी कारवाई करीत सर्वच पदार्थांच्या नावातून ‘चीज’ हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पदार्थांतून ‘चीज’ शब्द काढून टाकत पदार्थांची नवी नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे ‘चीज’च्या नावाखाली आतापर्यंत ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >>> मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील २० स्थानकांचा कायापालट होणार
अहमदनगर येथील ‘मॅकडोनॉल्ड’ येथील रेस्तराँमध्ये मिळणाऱ्या विविध पदार्थांमध्ये चीजसदृश्य पदार्थ वापरला जात होता. याबाबत अन्न व सुरक्षा आयुक्तांनी नेमलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांनी कारणेदाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीनंतरही रेस्तराँकडून काहीही कार्यवाही केली जात नव्हती. त्यामुळे राजेश बढे आणि डॉ. बी. डी. मोरे या अधिकाऱ्यांनी कारवाईचा इशारा दिला होता. अन्न व सुरक्षा आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले जात नसल्यामुळे अखेरीस या पदार्थांची विक्री थांबविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मात्र ‘मॅकडोनॉल्ड’ ही रेस्तराँची साखळी चालविणाऱ्या हार्डकॅसल रेस्तराँ प्रा. लि. या कंपनीने अखेरीस आपण पदार्थांची नावे बदलल्याचे पत्र या अधिकाऱ्यांना दिले आहे.
हेही वाचा >>> मुंबई विमानतळावरून तीन दिवसांत आठ किलो सोने जप्त
हा आदेश अहमदनगरपुरता मर्यादीत असला तरी ते राज्यातील ‘मॅकडोनॉल्ड’च्या सर्वच रेस्तराँना लागू आहे. या आदेशाची कोटेकोर अमलबजावणी केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी सांगितले. या रेस्तराँमधून प्रत्यक्षात चीजच्या नावाखाली चीजसदृश्य पदार्थ दिला जात आहे.
पदार्थांची नावे
बदललीवेज नगेटस (चीझी नगेटस), चेड्डार डिलाईट वेज – नॉनवेज बर्गर (मॅक चीज वेज – नॉनवेज बर्गर), अमेरिकन वेज बर्गर (कॉर्न अॅण्ड चीज बर्गर), अमेरिकन नॉन-वेज बर्गर (ग्रील्ड चिकन अॅण्ड चीज बर्गर), ब्ल्यु बेरी केक (ब्ल्यु बेरी चीज केक), इटालियन वेज- नॉन वेज बर्गर (चीजी इटालियन वेज- नॉन वेज बर्गर). (कंसात जुनी नावे)
‘मॅकडोनॉल्ड’कडून खुलासा
“महाराष्ट्रातील मॅकडोनाल्ड्स स्टोअर्समधील आमच्या मेन्यूमधून ‘चीज’ हा शब्द काढून टाकल्याच्या अलीकडील अहवालांबाबत आम्ही आमच्या ग्राहकांना खात्री देऊ इच्छितो की आम्ही आमच्या सर्व उत्पादनांमध्ये फक्त शुद्ध (रिअल), दर्जेदार चीज वापरतो. आम्ही या विषयावर संबंधित अधिकाऱ्यांसोबत सक्रियपणे काम करत आहोत. आमच्या घटकांमधील पारदर्शकतेप्रती आमची वचनबद्धता आणि आमच्या ग्राहकांना स्वादिष्ट, उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ देण्याप्रती समर्पितता अतूट आहे.”