मुंबई : उत्तर-पूर्व मुंबईचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार संजय पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत प्रचाराला येणार या नुसत्या विचारानेच वेड लागल्या सारखे बडबडत आहेत. त्यातूनच कदाचित ते पंतप्रधानांचा एकेरी भाषेत उल्लेख करीत आहेत, असा टोला भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी लगावला आहे.

कोटेचा यांनी चित्रफीत प्रसारित केली आहे. त्यात ते म्हणतात, मी निवडून आल्यानंतर सर्वात पहिले काम मानखुर्द शिवाजीनगरचे नाव केवळ शिवाजी नगर करण्याचे राहणार आहे. त्याचप्रमाणे झाकीर नाईकच्या अवलादींचे सगळे काळे धंदे, ड्रग्स असो की गुटखा की मटका सगळे बंद करण्यात येतील आणि सुशासन प्रस्थापित केले जाईल.

हेही वाचा – दोन मुले असल्याच्या कारणावरून महिला कर्मचाऱ्याला प्रसूती रजा नाकारणे अनुचित – उच्च न्यायालय

हेही वाचा – विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुन्हा पुढे ढकलली, आता ३० मे रोजी होणार परीक्षा

ते म्हणाले, मुंबई प्रेस क्लबने उमेदवारांची मुंबई शहराच्या विकासाबद्दल काय कल्पाना यावर चर्चा आयोजित केली होती. यासाठी संजय पाटील यांना आयोजकांनी निमंत्रण दिले होते. आयोजकांनी १५ फोन केले पण पाटील हे कार्यक्रमाला आले नाही. चर्चेपासून पळ काढला. यापूर्वी देखील पाटील यांनी अनेकदा पळ काढला आहे. उत्तर मुंबईच्या विकासाबाबत काय संकल्पना आहेत, याबाबत आपण त्यांच्याशी कुठेही सर्व जनतेसमोर चर्चा करायला तयार आहे. पाटील यांनी माझे आव्हान स्वीकारावे आणि त्यांच्यावर लागलेला पळपुटेपणाचा आरोप आपण पुसून काढावे, अशी टीका कोटेचा यांनी केली.