‘मोमोज शाऊट’ या नावाप्रामाणेच इथल्या मोमोजविषयी अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यासारख्या असून अनेक प्रकार आणि वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले मोमोज आवर्जून खाण्यासारखे आहेत. येथे व्हेजमध्ये आठ प्रकारांमध्ये तर नॉनव्हेजमध्ये पाच प्रकारांमध्ये मोमोज मिळतात. मराठमोळय़ा मोदकासारखे दिसणारे हे मोमोज सध्या खवय्यांमध्ये खूपच प्रसिद्ध होत आहेत.

मुंबईच्या काही भागांमध्ये अलीकडच्या काळात एक वेगळा पदार्थ गर्दी खेचू लागला आहे. सकाळी दक्षिणेकडच्या पदार्थाना (इडली, मेदूवडा) प्राधान्य देणारा मुंबईकर संध्याकाळी थेट ईशान्येकडे वळलेला दिसतो. इडली तयार करण्यासारख्याच जर्मनच्या मोठय़ा भांडय़ात तयार केला जाणारा हा पदार्थ म्हणजे मोमोज. दिसायला नक्षीदार, पाहताच क्षणी भूक चाळवणारा, पचायला हलका आणि खिशालाही परवडणारा. पण मुंबईतील इतर पदार्थाच्या मानाने नवीन असलेला हा पदार्थ नेमका कुठे चांगला मिळतो याचा जेव्हा शोध घ्यायचा ठरवलं तेव्हा थेट चेम्बूर गाठावं लागलं. ‘मोमोज शाऊट’ या नावाप्रामाणेच इथल्या मोमोजविषयी अनेक चांगल्या गोष्टी सांगण्यासारख्या असून अनेक प्रकार आणि वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले मोमोज आवर्जून खाण्यासारखे आहेत. विशेष म्हणजे अस्मिता सदामस्त या मराठमोळ्या तरुणीने वर्षभरापूर्वीच मोमोज शाऊटची सुरुवात केलीय. तसंच फार थोडय़ा अवधीतच लोकांच्या पसंतीस उतरून दहाव्या क्रमांकावरून थेट पाचव्या स्थानी झेप घेण्याची कामगिरी मोमोज शाऊटने केली आहे.

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Nashik heat, Temperature Hits New High, 40 Degrees Celsius, nobody on manmad street market, summer, summer news, summer in nashik, heatwave in nashik, heat wave in manmad, manmad news, nashik news,
नाशिक : उंचावणाऱ्या तापमानाने आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ, मनमाडमधील रस्त्यांवर असलेला शुकशुकाट
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
The Food and Agriculture Organization of the United Nations has projected an increase in wheat production worldwide including in India
भारतात यंदा उच्चांकी गहू उत्पादन? काय कारण? जगात काय स्थिती?

मोमोज शाऊटमध्ये तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही प्रकारचे मोमोज मिळतात. व्हेज मोमोज, व्हेज चीज. पनीर, पनीर शेझवान, चिली पनीर, कॉर्न अ‍ॅण्ड चीज, मशरूम शेझवान, व्हेज चीज शेझवान असे तब्बल आठ पर्याय आहेत. तर नॉनव्हेजमध्ये चिकन, चिकन चीज, चिकन शेझवान, चिली चिकन, चिकन कॉर्न अ‍ॅण्ड चीज असे पाच पर्याय आहेत. पण एवढय़ावरच इथलं वेगळंपण संपत नाही. हे सर्व प्रकार तीन वेगवेगळ्या पद्धतीने तयार केले जातात. तुमची जशी आवड आणि आरोग्यविषयक तुम्ही पाळत असलेल्या गोष्टी विचारात घेऊन तुम्ही त्या पद्धतीचे मोमोज ऑर्डर करू शकता. स्टीम म्हणजेच फक्त वाफवलेले, डीप फ्राय म्हणजे तळलेले आणि पॅन फ्राय म्हणजेच तळून घेऊन नंतर पुन्हा पॅनमध्ये ग्रेव्हीसह परतवून घेतलेले. हे तीनही मोमोज बनवतानाच्या पद्धती वेगवेगळ्या असल्याने ते चवीलाही वेगळे आहेत. स्टीम मोमोज तुम्ही हातात पडल्या पडल्या फस्त करू शकता. परंतु, डीप फ्राय आणि पॅन फ्राय खाताना थोडं सबुरीने घ्यावं लागतं. ते गरमागरम तोंडात घातल्यास त्याची चव तर लक्षात येणार नाहीच पण तुमची जीभही भाजेल. त्यामुळे त्याचा योग्य तो आनंद घेण्यासाठी वाफा जाईपर्यंत फोटोसेशन करून घ्याला हरकत नाही.

मोमोज तयार करताना सुरुवात होते त्याच्या बाहय़ आवरणापासून. बाहय़ आवरण म्हणून वापरलं जाणारं पीठ मळून घेताना ते अधिक कडक किंवा फार पातळ मळून चालत नाही. कारण त्या मळण्यावरच पुढील सर्व खेळ अवलंबून आहे. मोमोज तयार करण्याआधी लाटली जाणारी छोटी पोळीही किती जाडीची असावी आणि त्याचा आकार काय असावा याकडेही विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण नाही तर सारण भरल्यानंतर मोमोजला आकार देताना ते सर्व एकसमान न होता लहान-मोठे होण्याचा धोका असतो. इथल्या मोमोजचं आणखी एक वेगळेपण म्हणजे प्रत्येक मोमोजला वेगवेगळा आकार देण्यात आलेला आहे. त्यावरूनच त्या मोमोजची ओळख खवय्यांना होते. त्यामुळे मेन्यूमध्ये असलेल्या व्हेज आणि नॉनव्हेजच्या तेरा प्रकारांना तेरा वेगवेगळे आकार देण्यात आलेत. इथे येणारे खवय्येही आता आकारावरून त्यांचे आवडते मोमोज ओळखायला लागलेत. ६० रुपयांपासून १३० रुपयांपर्यंत मोमोजच्या किमती असून प्रत्येक प्लेटमध्ये सहा मोमोज येतात. हे मोमोज त्यांच्याच किचनमध्ये तयार करण्यात आलेल्या चविष्ट शेझवान चटणीसोबत सव्‍‌र्ह केले जातात.

एखाद्या दिवशी फक्त मोमोजच भरपेट खायचे असतील आणि त्यामध्येही तुम्हाला व्हरायटी हवी असेल तर कॉम्बोजचाही पर्याय आहे. तीन वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बे देण्यात आलेले आहेत. व्हेज कॉम्बोमध्ये (फक्त स्टीम) कुठल्याही दोन प्रकारचे मोमोज सॉफ्ट िड्रक्ससह सव्‍‌र्ह केले जातात. त्याची किंमत १८० रुपये आहे. नॉनव्हेज कॉम्बो (फक्त स्टीम) मध्ये कुठल्याही दोन प्रकारचे नॉनव्हेज मोमोज सॉफ्ट िड्रक्ससह सव्‍‌र्ह केले जातात. त्याची किंमत २२० रुपये आहे. तर व्हेज आणि नॉनव्हेज कॉम्बोमध्ये (फक्त स्टीम) कुठल्याही एकेका प्रकारचे व्हेज आणि नॉनव्हेज मोमोज मागवता येतात. सॉफ्ट िड्रक्ससह २०० रुपये त्याची किंमत आहे.

मोमोजशिवाय सर्वाच्याच आवडीचे चायनिज पदार्थही येथे मिळतात. व्हेज, नॉनव्हेज स्टार्टर, नूडल्स, राइसचे विविध प्रकारदेखील येथे उपलब्ध आहेत. त्यातही मोमोज शाऊटचे स्पेशल राइस आणि नूडल्स आवर्जून खाण्यासारखे आहेत. गरमागरम मोमोज तिथेच बसून खाण्यातच खरी मजा असली तरी ते घरी ऑर्डरही करता येऊ शकतात. त्यामुळे त्याच त्याच गोष्टी खायला तुम्ही कंटाळला असाल तर कधी तरी तीन वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले विविध प्रकारचे मोमोज चाखायला हरकत नाही.

मोमोज शाऊट

  • कुठे ? शॉप नं ३, प्लॉट नं ११६, एकज्योत सत्कार सोसायटी, कलेक्टर्स कॉलनी, स्वामी विवेकानंद रोड, चेंबूर – ४०००७४
  • कधी ? सोमवार के रविवार सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत