बाबा पटेल ट्रस्टच्या विनंतीनंतर न्यायालयाकडून ‘कोर्ट रिसिव्हर’ची नियुक्ती

दिवंगत शास्त्रीय गायिका आणि संगीत नाटक अकादमी विजेत्या सुशीलारानी पटेल यांच्या बँक खात्यात कोटय़वधींची मालमत्ता असून त्यात चलनातून रद्द झालेल्या नोटांचा समावेश असू शकतो. तसेच असे असल्यास ३० डिसेंबरनंतर या पैशांना काहीच किंमत राहणार नाही, अशी बाब पटेल यांच्या ट्रस्टच्या वतीने शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

न्यायालयानेही चलनकल्लोळाच्या पाश्र्वभूमीवर ट्रस्टने उपस्थित केलेल्या मुद्दा गांभीर्याने घेत ही खाती उघडण्यासाठी आणि त्यात चलनातून बाद झालेल्या नोटांचा समावेश आहे की नाही याची पाहणीसाठी ‘कोर्ट रिसिव्हर’ची नियुक्ती केली आहे.

शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ाची दखल घेत न्यायालयाने कोर्ट रिसिव्हर नियुक्त केला. तसेच कोर्ट रिसिव्हरला पटेल यांची खाती उघडण्याची तसेच त्यात चलनातून बाद झालेल्या नोटा आहेत की नाही हे पाहू देण्याचे आदेश बँकेला दिले आहेत. ही खाती उघडून त्यातील दागिन्यांसह सगळे पैसे पटेल यांच्या नावे नवे बँक खाते उघडून त्यात ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

इच्छापत्राचा वाद

पटेल यांचे जुलै २०१४ मध्ये निधन झाले होते. त्यांच्या इच्छापत्रानुसार, त्यांचा पाली हिल येथील बंगला ‘गिरनार’ आणि अन्य मालमत्ता शास्त्रीय संगीत आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टच्या नावे त्यांनी केली होती. गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्या इच्छापत्राचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे.