मुंबई : यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्र किनाऱ्यावर साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार असून यात जून महिन्यातील ७ दिवस , जुलै महिन्यातील ४ दिवस , ऑगस्ट महिन्यातील ५ दिवस, तर सप्टेंबर महिन्यातील ६ दिवसांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक उंच लाटा या २० सप्टेंबर रोजी मध्यरात्री १ वाजून ३ मिनिटांनी उसळणार असून यावेळी लाटांची उंची ४.८४ मीटर इतकी असेल.

यंदा पावसाळ्यात समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांचे दिवस आणि वेळांची यादी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने नुकतीच जाहीर केली आहे. या यादीनुसार, यंदा पावसाळ्यात एकूण २२ दिवस उंच लाटा उसळणार आहेत.

dams of Nashik district
नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा आठ टक्क्यांवर
22 high tides during the monsoon season
या आठवड्यात समुद्रात मोठी भरती; साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार, पावसाळ्याच्या चार महिन्यात २२ दिवस मोठ्या भरतीचे
1st June Panchang & Marathi Rashi Bhavishya
१ जून पंचांग: शनिवारी प्रीती खुलणार! मेष ते मीनपैकी १२ राशींना जून महिन्याचा पहिला दिवस कसा जाणार, वाचा भविष्य
Yavatmal, temperature,
यवतमाळ : ३५ वर्षांपूर्वी पारा गेला होता ४६.६ अंशावर, शनिवार हंगामातील सर्वाधिक उष्ण दिवस
Horoscope Saturn will be vakri for 5 months Lakshmi's grace will be on these two signs
५ महिने शनि असणार वक्री; ‘या’ दोन राशींवर असणार लक्ष्मीची कृपा अन् ‘या’ दोन राशींना आर्थिक समस्या उद्भवणार
Unseasonal Rain, Unseasonal Rain in Maharashtra, Heat Wave in Maharashtra, Yellow Alert, India Meteorological Department
ऊन-पावसाचा लपंडाव! कुठे पावसाच्या सरी तर कुठे घामाच्या धारा; हवामान खाते म्हणते…
Thirty five percent posts vacant and election work yet 12th result on time
पस्तीस टक्के पदे रिक्त, निवडणुकीचे काम तरीही बारावीचा निकाल वेळेत
silver rate increase by 11 29 percent in the month of may 2024
चांदीची भांडवली बाजाराच्या परताव्यालाही मात; मे महिन्यातील भावात ११.२९ टक्क्यांची तेजी

हेही वाचा…‘महाराष्ट्र दिना’ च्या मुहूर्तावर दोन मराठी चित्रपट आमनेसामने

दरम्यान, मोठ्या भरतीच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून करण्यात आले आहे.

अधिक उंचीच्या लाटांचा तपशिल

दिनांक – वेळ – भरतीची उंची

१) २१ ऑगस्ट – दुपारी १२.५७ वा. – ४.८१ मीटर

२) २२ ऑगस्ट – दुपारी ०१.३५ वा. – ४.८० मीटर

हेही वाचा…कोन, पनवेलमधील गिरणी कामगारांचे देखभाल शुल्क लवकरच माफ
३) १९ सप्टेंबर – दुपारी १२.२४ वा. – ४.७८ मीटर
४) २० सप्टेंबर – मध्यरात्री ०१.०३ वा. – ४.८४ मीटर
५) २१ सप्टेंबर – मध्यरात्री ०१.४७ वा. – ४.८२ मीटर