Premium

तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो १ विस्कळीत

मुंबईतील घाटकोपर- वर्सोवा मार्गावर धावणारी मुंबई मेट्रो १ ची वाहतूक सेवा बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून घाटकोपर स्थानकावर असलेल्या मेट्रोचे एका बाजूचे दरवाजे उघडत नसल्यामुळे विस्कळीत झाली होती.

mumbai metro
तांत्रिक बिघाडामुळे मुंबई मेट्रो १ विस्कळीत (फोटो सौजन्य : संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता )

मुंबई : मुंबईतील घाटकोपर- वर्सोवा मार्गावर धावणारी मुंबई मेट्रो १ ची वाहतूक सेवा बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून घाटकोपर स्थानकावर असलेल्या मेट्रोचे एका बाजूचे दरवाजे उघडत नसल्यामुळे विस्कळीत झाली होती. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्यांची गैरसोय झाली. दरम्यान, मेट्रो प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. दुरुस्तीअंती घाटकोपर- वर्सोवादरम्यानची मेट्रो वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा तांत्रिक बिघाड कार्यालयीन वेळेत झाल्यामुळे घाटकोपर स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती. मेट्रोची सेवा साधारण १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होती. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. दरम्यान, सकाळच्या वेळी मेट्रोमध्ये मुंबईतील लोकलइतकीच गर्दी असते. त्या वेळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. परंतु, दुरुस्ती केल्यानंतर मेट्रो सेवा सुरळीत सुरू झाली, असे मुंबई मेट्रो १च्या प्रशासनाने स्पष्ट केले. मंगळवारीदेखील तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक विलंबाने मुंबई मेट्रो १ची वाहतूक मंगळवारीदेखील तांत्रिक बिघाडामुळे विलंबाने धावत होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai metro 1 disrupted due to technical glitch mumbai amy

First published on: 05-10-2023 at 03:36 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा