मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग कोसळण्याच्या दुर्घटनेनंतरही सावध न झालेल्या राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अलीकडेच उरण खिंड येथील दरड तसेच गोरेगाव पूर्वेतील झोपडपट्टी परिसरातील भूस्खलन रोखण्यासाठी अननुभवी कंत्राटदाराची नियुक्ती केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावामुळे पात्र ठरवून हे काम देण्यात आले आहे. अशा अननुभवी कंत्राटदारामुळे भविष्यात दुर्घटना घडली तर नाहक निष्पापांचे बळी जाण्याची भीती वर्तविली जात आहे.

सायन-पनवेल महामार्गावरील उरण खिंडीत प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या दुर्घटना होतात. आतापर्यंत या मार्गावर दरड प्रतिरोधक यंत्रणा उभारण्यात आलेली नव्हती. मात्र यंदा पहिल्यांदाच अशी यंत्रणा उभारण्यासाठी आठ कोटींची तर गोरेगाव पूर्वेतील राजीव गांधी नगर झोपडपट्टीचे दरड कोसळण्यासाठी संरक्षण करण्यासाठी चार कोटींची निविदा जारी करण्यात आली. यासाठी मे. जयभारत कन्स्ट्रक्शन, पायोनिअर फौडेशन आणि स्पॅरजिओ, दिल्ली अशा तीन कंत्राटदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. यासाठी अनुभव आवश्यक होता. अनुभवाबाबत सादर झालेल्या प्रमाणपत्रांनुसार पायोनिअर आणि स्पॅरजिओ या कंपन्या पात्र ठरता होत्या तर मे. जयभारत कन्स्ट्रक्शनने सादर केलेली प्रमाणपत्रे बनावट असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य आढळल्याने या निविदेसाठी मे. जयभारत कन्स्ट्रक्शन वगळता अन्य दोघे पात्र ठरत होते. या सर्व निविदा महाऑनलाईनवर उपलब्ध असल्यामुळे ही बाब स्पष्ट होत होती. परंतु प्रत्यक्षात हे कंत्राट मे. जयभारत कन्स्ट्रक्शनला देण्यात आले. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई विभागाचे मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी, सहायक अभियंत्यांकडून जो प्रस्ताव आला त्याला आपण मंजुरी दिली, असे सांगितले. अनुभवाची प्रमाणपत्रे बोगस असल्याच्या आरोपाबाबत त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी, आपण रस्ते विभागाच्या सचिवांकडून अधिक माहिती घेऊ, असे सांगितले.

rain, Mumbai, light rain,
मुंबईत आज हलक्या पावसाची शक्यता
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Anjali Damania Question to Ajit Pawar
Porsche Accident: “अल्पवयीन मुलासाठी अजित पवारांचा पोलीस आयुक्तांना फोन?” अंजली दमानियांचा आरोप काय?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Mumbai Thane Kalyan Bhiwandi Lok Sabha Election Result Live Updates in Marathi
Thackeray vs Shinde Lok Sabha Election Result 2024 Updates : मुंबईत ठाकरेंचे दोन, भाजपा अन् शिंदे गटाचा एक उमेदवार विजयी घोषित; दोन जागांवरचा निकाल प्रतिक्षेत!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!

हेही वाचा – यंदा वाढदिवसालाच डेक्कन क्वीन रद्द, मुंबई – पुणे प्रवाशांचे हाल

हेही वाचा – विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे. जयभारत कन्स्ट्रक्शन हे रस्ते बांधणीतील कंत्राटदार असून भूस्खलन आणि दरड रोखण्याबाबत तांत्रिक अनुभव नसतानाही त्यांना हे कंत्राट देण्यात आलेले आहे. या कंत्राटदाराने अनुभव म्हणून मे. सुयोग गुरबक्षणी फ्युनिक्युलर रोपवे लि. तसेच आयडिअल जिओटेक्निकल सर्व्हिस यांच्यासाठी काम केल्याचे प्रमापणपत्र जोडले असले तरी ते खोटे असल्याचा आरोप केला जात आहे. याआधी या कंत्राटदाराने अंधेरी पश्चिमेतील गिल्बर्ट हिलमधील कंत्राट मिळविण्यासाठी खोटी अनुभव प्रमाणपत्रे सादर केली होती. याबाबत मे. जयभारत कंन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव अंधेरी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ६ जानेवारी २०२१ मध्ये सादर केला होता. तरीही या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.