कांदिवलीतील आगीत दोघांचा मृत्यू

मृत्यूप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

मुंबई : कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवरील हंसा हेरिटेज या १५ मजली इमारतीच्या १४ व्या मजल्यावर शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीत अडकलेल्या ७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र आगीत होरपळून गंभीर जखमी झालेल्या महिलेसह दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूप्रकरणी कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. इमारतीच्या १४ मजल्यावरील एका घरामध्ये ही आग लागली. आग क्षणात भडकली. यात दोन जण होरपळून गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai two dead in fire at kandivali zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या