scorecardresearch

नागपूरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ४० जागा भरण्यास परवानगी

‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) आयत्यावेळी परवानी दिल्याने नागपूरच्या ‘सरकारी वैद्यकीय महाविद्यालया’ला या वर्षी पुन्हा ४० जागांचे प्रवेश करता येणार आहेत.

‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) आयत्यावेळी परवानी दिल्याने नागपूरच्या ‘सरकारी वैद्यकीय महाविद्यालया’ला या वर्षी पुन्हा ४० जागांचे प्रवेश करता येणार आहेत. वैद्यकीय संचालनालयाच्या पुढील प्रवेश फेरीत या जागा अंतर्भूत करून भरल्या जातील.
काही पात्रता निकषांची पूर्तता न केल्याने महाविद्यालयाचे एकूण १०० पैकी ४० जागांवरील प्रवेश दरवर्षी अनिश्चित असतात. महाविद्यालयाकडे विद्यार्थिनी व परिचारिकांसाठी स्वतंत्र वसतिगृह नाही. तसेच, निकषांप्रमाणे ग्रंथालयासाठी आवश्यक असलेली स्वतंत्र इमारतही नाही. त्याचप्रमाणे अध्यापकांच्या काही जागाही रिक्त आहेत. या त्रुटी दूर करण्याची संधी दरवर्षी एमसीआय सरकारला देते. त्यासाठी राज्य सरकारला एमसीआयकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. प्रतिज्ञापत्र सादर झाल्यावर एमसीआय महाविद्यालयाला अटींच्या आधीन राहून ४० जागा भरण्याची परवानगी देते. हा प्रकार १९९७ पासून सुरू आहे.
यंदाही एमसीआयने राज्य सरकारचे प्रतिज्ञापत्र सादर झाल्यानंतर महाविद्यालयाला जागा भरण्यास परवानगी दिली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशांसाठी वैद्यकीय संचालनालयातर्फे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पहिली प्रवेश फेरी सुरू होईपर्यंत एमसीआयने ४० जागा भरण्यास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे, नागपूरच्या केवळ ६० जागांचे प्रवेश पहिल्या फेरीत करण्यात आले. उर्वरित ४० जागा दुसऱ्या फेरीत देण्यात येतील.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-08-2013 at 03:49 IST

संबंधित बातम्या