राष्ट्रवादीचा २६/ २२ फॉम्युला काँग्रेसला कदापि मान्य नाही असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी कामोठे इथे बोलताना स्पष्ट केले.
समविचारी पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसला निवडणूकांना सामोरे जायचे आहे, पण मित्रपक्ष त्रास देणार असतील तर वेगळा विचार करावा लागेल. असा इशारा राष्ट्रवादीचे नाव न घेता ठाकरे यांनी बोलून दाखविला.
 काँग्रेसला कोणी कमी लेखू नये, काँग्रेस जशास तसे उत्तर देईल असा इशारा त्यांनी दिला. रायगड जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने रायगड जिल्ह्य़ातील जनजागरण अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित सुरु केला. शेकाप हा धंदेवाईक नेत्यांचा पक्ष आहे. त्यामुळे हा पक्ष रायगडच्या बाहेर वाढू शकला नाही. असे ठाकरे यांनी सांगितले.
विरोधी पक्षांनी कितीही वल्गना केल्या तरी या देशाचा विकास हा काँग्रेस पक्षाने केला असून रोजगार, अन्न सुरक्षा विधेयक कायदे हे फक्त काँग्रेस पक्षच करु शकतो, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी
सांगितले.
राष्ट्रवादीला २२ जागा हव्यात
लोकसभेसाठी काँग्रेस२६ राष्ट्रवादी २२ चा फॉम्र्युला ठरला आहे.  असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. सातारा येथे आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ता शिबिरात अजित पवार बोलत होते.  दोषारोप करणाऱ्यांना जशास तसे उत्तर द्या, असा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला.सरकारने व पक्षाने दुष्काळात खूप चांगले काम केले आहे. सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवा.