घाटकोपरमधील व्यावसायिकाची पावणेदोन कोटींची फसवणूक

Property worth 113 crores seized by ED in case of builder Tekchandani
बांधकाम व्यावसायिक टेकचंदानी प्रकरणी ११३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, ईडीची कारवाई
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

मुंबई: बंगळुरू येथील कंपनीच्या निर्यात परवान्यांची चोरी करून घाटकोपर येथील व्यावसायिकाला पावणेदोन कोटींना विकून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. चोरी झालेल्या ८० निर्यात परवान्यांपैकी २१ निर्यात परवान्यांची विक्री तक्रारदार व्यावसायिकाला करण्यात आली होती. याप्रकरणी घाटकोपर येथील पार्कसाईट पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार सागर महेंद्र भायाणी (४१) यांचा निर्यात परवान्यांचा व्यवसाय आहे. आरोपी व्यावसायिकाने त्यांच्याशी संपर्क साधून ३१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२१ या कालावधीत २१ निर्यात परवान्यांची विक्री केली. त्यासाठी तक्रारदार यांनी एक कोटी ७६ लाख १३६ रुपये दिले. नुकतीच तक्रारदार यांनी वृत्तपत्रामध्ये एक जाहीर नोटीस वाचली. त्यात बंगळूरू येथील फस्र्ट स्टेप बेबी वेअर या कंपनीची ८० परवान्यांची ऑनलाइन चोरी झाल्याचे नमूद करण्यात आले होते. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या २१ परवान्यांचाही त्यात समावेश होता. ते वाचल्यानंतर परवाने विकणाऱ्या व्यावसायिकांना त्यांच्याशी तात्काळ संपर्क साधला व त्या परवान्यांची रक्कम परत मागितली. ती देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी याप्रकरणी घाटकोपर येथील पार्कसाईट पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.