हल्ल्यात नव्हे, दगडफेकीत जखमी

‘‘माझ्यावर कुणीही धारदार शस्त्राने हल्ला केलेला नाही तर मी केवळ दगडफेकीत जखमी झालो,’’ असे शिवसेना-मनसेच्या राडय़ात जखमी झालेले पोलीस हवालदार अशोक थोरबोले यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

‘‘माझ्यावर कुणीही धारदार शस्त्राने हल्ला केलेला नाही तर मी केवळ दगडफेकीत जखमी झालो,’’ असे शिवसेना-मनसेच्या राडय़ात जखमी झालेले पोलीस हवालदार अशोक थोरबोले यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या जबानीमुळे या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
२४ एप्रिल रोजी पहाटे दोनच्या सुमारास मानखुर्द येथे शिवसेना आणि मनसे पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून मारामारी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अशोक थोरबोले (३८) घटनास्थळावर गेले होते. त्यावेळी जमावाने केलेल्या हल्ल्यात थोरबोले जखमी झाले होते. थोरबोले यांच्यावर या प्राणघातक हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. जखमी झालेल्या थोरबोले यांचा जबाब आतापर्यंत पोलिसांना घेता आलेला नव्हता. पण गुरूवारी थोरबोले यांनी हा जबाब दिला. ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक सत्र सुरू केले आहे. शिवेसनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या पत्नीही या प्रकरणातील आरोपी आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police constable says he hit by a stone

ताज्या बातम्या