केंद्रांचे उद्घाटन, फलकबाजीतून श्रेय मिळवण्याचा प्रयत्न; महापालिका आयुक्तांनी फटकारले

मुंबई : करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या निमित्ताने मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षी होऊ घातलेल्या निवडणुकीचा प्रचार आतापासूनच सुरू झाला आहे. लशी उपलब्ध आहेत का याची खातरजमा करण्याऐवजी लसीकरण केंद्रांचे उद्घाटन सोहळे, फलकबाजी, श्रेय घेण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू आहे. पालिकेच्या खर्चाने लसीकरण होत असताना लोकप्रतिनिधींकडून अशी जाहिरातबाजी होऊ लागल्याबद्दल महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लसीकरण मोहिमेत राजकीय पक्षांच्या जाहिराती टाळाव्यात, असे आदेशही दिले आहेत.

फे ब्रुवारी २०२२ मध्ये पालिके च्या निवडणुका होणार असून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम त्यातील प्रचाराचा भाग होऊ लागला आहे. पालिके ने मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण के ंद्रे सुरू के ली आहेत. या लसीकरण केंद्रांच्या बाहेर लसीकरण सुरू आहे किं वा नाही या फलकापेक्षाही आधी एखाद्या राजकीय पक्षाचा किं वा नेत्याचा फलक नजरेस पडतो. अनेक लोकप्रतिनिधींनी या केंद्रांच्या बाहेर आपल्या पक्षाला किं वा लोकप्रतिनिधींना श्रेय देणारे फलक लावले आहेत. शहरातील बहुतेक लसीकरण केंद्रे पालिके च्या खर्चाने व पालिके च्या जागेत सुरू झालेली आहेत, मात्र अमुकतमुक यांच्या प्रयत्नाने लसीकरण केंद्र सुरू झाल्याच्या जाहिराती अगदी सत्ताधारी पक्षापासून ते विरोधी पक्षापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधी करत असल्याचे दिसत आहे. सध्या गृहसंकुलांत लसीकरण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याचा खर्च बहुतेक सोसायटय़ा करत आहेत. तसेच बहुतेक ठिकाणी लस खासगी रुग्णालयांच्या दराने दिली जात आहे.

Uddhav Thackeray Shivsenas Manifesto
शेतकऱ्यांना कर्जमुक्त, शेतीच्या उपकरणांवरील जीएसटी माफ करणार; ठाकरे गटाच्या जाहीरनाम्यात मोठ्या घोषणा
Thane, ST, bogus certificate,
ठाणे : बोगस प्रमाणपत्राच्या आधारे एसटी महामंडळात नोकरी
Nashik Lok Sabha, mahayuti, Candidate , Bhujbal Farm, Office Reflects Silent Tension, chhagan bhujbal, hemant godse, bjp,
नाशिकच्या जागेचा तिढा अन् भुजबळ फार्मची शांतता
loksatta viva Artificial Intelligence Lok Sabha Election social media
AIच्या गावात!

लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीबाबत अनेक तक्रारी पालिके कडे येत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी जाहिरातबाजी रोखण्याची तंबी दिली आहे. अशा प्रकारच्या अनुचित जाहिराती करणे हे वस्तुस्थिती व सौजन्याला धरून योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या या वर्तनाचा समाचार घेतला आहे. एखाद्या विभागात एखादा लोकप्रतिनिधी अशी जाहिरात करत असल्यास त्यांना जाहिरात करू नये, असे आवाहन करावे असे आदेश आयुक्तांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व साहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत. तसेच लोकप्रतिनिधींशी संवाद साधून या जाहिराती काढून टाकण्याबाबत विनंती करावी, असेही सांगण्यात आले आहे. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

साठा आल्यास लसीकरण सुरू

मुंबई : मुंबईला मिळालेला लससाठा संपल्यामुळे गुरुवारी दिवसभर पालिके च्या व सरकारी केंद्रावरील लसीकरण पूर्णत: बंद ठेवावे लागले होते. मात्र शुक्र वारी मुंबई महापालिके ला ८७ हजार मात्रा उपलब्ध होण्याची शक्यता असल्यामुळे लगेचच पालिके च्या केंद्रांवरील लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबईत एकीकडे लसीकरण केंद्रांची संख्या वाढवलेली असताना लससाठा मात्र अपुरा असल्यामुळे ८० टक्के  लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. त्यातच केंद्र सरकारकडून पालिके ला दर दिवशी मर्यादित लससाठा मिळत असल्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या लसीकरणाचे नियोजन करताना पालिके च्या नाकीनऊ येत आहेत. बुधवारी रात्री लससाठा उपलब्ध नसल्यामुळे गुरुवारी लसीकरण बंद ठेवावे लागले. आता शुक्रवारी साठा उपलब्ध झाल्यास लसीकरण पुन्हा सुरू होईल.

‘लक्ष्य गाठणे कठीण’

सध्या ३३ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे, त्यापैकी साडेसात लाख लोकांच्या दोन्ही मात्रा घेऊन झाल्या आहेत. त्यामुळे हे लसीकरण पूर्ण करण्यासाठी दर दिवशी लाखभर नागरिकांचे लसीकरण करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने पालिके ची तयारीदेखील आहे. मात्र लससाठा पुरेसा येत नसल्यामुळे हे लक्ष्य गाठणे कठीण होऊ लागले आहे. दर एक-दोन दिवसांनी लाखभर मात्रा उपलब्ध होत असल्यामुळे साठा पाहून नियोजन करावे लागत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.