प्रभात प्रकाशनचे मालक मुद्रक, प्रकाशक शिवा घुगे यांचे शनिवारी पहाटे केईम रुग्णालयात निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे
दै. महानगरमध्ये डीटीपी ऑपरेटर म्हणून कामास सुरवात केल्यापनंतर त्यांनी नंतर स्वत:ची प्रकाशन संस्था सुरु केली आणि अगदी तरुण वयात स्वत:चे मुद्रणालयही सुरु केले. मराठी भाषा आणि साहित्य यांना वाहिलेल्या ‘समकालीन संस्कृती’ या मासिकाने त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.
या मासिकाचे संपादक म्हणून विजय तापस, प्रदीप कर्णिक आदींनी काम पहिले. सुनिल कर्णिक यांचे ‘बिन मौजेच्या गोष्टी, सारंग दर्शने यांनी लिहिलेले अण्णा हजारे यांचे चरित्र, ज्ञानेश महाराव यांचे ’ठाकरे फॅमिली’ पुस्तके तसेच प्रकाश अकोलकर लिखित ‘शिवसेनेचा इतिहास’ अशी वेगळ्या विषयावरील पुस्तके तसेच नामदेव ढसाळ, नितीन तेंडूलकर, विठ्ठल उमप, गणपत पाटील, रामभाऊ कापसे, द्वारकानाथ संझगिरी, अशोक राणे आदी लेखकांची पुस्तके त्यांनी प्रकाशित केली होती.