मुंबईतल्या दादरमधील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी हजेरी लावली. यावेळी राहुल गांधी म्हणाले, आपल्या पक्षात सगळे सिंह आहेत, जे कोणालाच घाबरत नाहीत. परंतु, त्यांना (मोदी सरकारला) आपल्या या सिंहांची भिती वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीला आपल्या या सिंहांची भिती वाटते. तुम्ही बघाल आगामी निवडणुकीत भाजपाचा महाराष्ट्रात सुपडा साफ होणार आहे.

राहुल गांधी म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत झालं तेच आगामी तेलंगणा राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये होणार आहे. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी भाजपाला हरवणार आहे. मीडिया काहीही म्हणो, मोदी सरकारने कोणत्याही सरकारी संस्थांचा वापर केला तरी आपणच जिंकणार.

Supriya Sule on Ajit Pawar at baramati rally
“करारा जवाब मिलेगा…”, सुप्रिया सुळेंचा बारामतीमध्ये इशारा; म्हणाल्या, “उद्रेक होईल…”
No sign of Gandhis yet from Amethi
राहुल अन् प्रियंका गांधी दोघांनीही निवडणूक लढवावी ही कार्यकर्त्यांची इच्छा; पण घोषणा नाही, काँग्रेसचं चाललंय काय?
ubt shiv sena candidate chandrahar patil meet congress leaders in sangli
बंडखोरीवर कारवाई टाळत मविआ उमेदवाराला विजयी करण्याचे पटोलेंचे आवाहन
Leaders of Mahavikas Aghadi ignore Yavatmal-Washim
महाविकास आघाडीच्या नेत्यांची यवतमाळ-वाशिमकडे पाठ?

हे ही वाचा >> इंडिया आघाडीने मुंबईतल्या बैठकीत घेतले दोन मोठे निर्णय, राहुल गांधी माहिती देत म्हणाले…

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची एक जागा असते. काही पक्ष या वरिष्ठ नेत्यांमुळे निवडणुका जिंकतात. परंतु, आमचे कार्यकर्ते हेच आमच्या पक्षाला निवडणुकांमध्ये जिंकवतात. आपल्या पक्षात एक कमी आहे. त्यात आपल्याला दुरुस्ती करायची आहे. जो कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी घाम गाळतो, रक्त सांडतो त्याला योग्य बक्षीस मिळायला हवं. आपलं नातं वेगळं आहे. आपलं नात भाजपा-आरएसएससारखं नाही. आपलं प्रेमाचं नातं आहे. आम्ही तिरस्कार आणि हिंसेच्या मार्गाने काम करत नाही.