Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात.कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. कधी कोणी अनोखा जुगाड सांगताना दिसतात तर कधी कोणी त्यांची कला सादर करताना दिसतात. तुम्ही पुशअप्स मारताना तरुणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील पण सध्या पुशअप्स मारणाऱ्या एका आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. डोक्यावर पांढरी टोपी आणि पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा घालून हे वृद्ध व्यक्ती पुश अप्स मारताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तु्म्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक आजोबा निसर्गाच्या सानिध्यात पुशअप्स मारताना दिसतात. हल्ली तरुण मंडळींमध्ये जिमचे वेड दिसून येते पण या आजोबांची ऊर्जा पाहून तरुण मंडळी सुद्धा थक्क होईल. या आजोबांनी पांढरा शुभ्र सदरा आणि पायजमा घातला आहे. त्यांच्या डोक्यावर पांढरी टोपी आहे. मराठी पोशाखात हा मराठी माणूस पुश अप्स मारताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Man wrote message for his wife in back of the car
नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
kids haute expression and dance on the song Gulabi Sadi
अय्या, किती गोड! ‘गुलाबी साडी’ गाण्यावर चिमुकल्याचे हटके एक्स्प्रेशन आणि डान्स; VIDEO पाहून म्हणाल, “याच्यापुढे सारे फिके”
a young man hides wine bottle in secret locker of vehicle
पठ्ठ्याने गाडीमध्ये ‘या’ सीक्रेट जागी लपवल्या दारूच्या बाटल्या; VIDEO पाहून डोकं धराल
kids poem ek hoti idli goes viral
VIDEO : “एक होती इडली, ती होती चिडली; धावता धावता सांबारात जाऊन पडली” चिमुकल्याची कविता होतेय व्हायरल
five young boys doing stunt on moving bike on a road
VIDEO : बापरे! चालत्या दुचाकीवर धिंगाणा; दोन, तीन नाही तर तब्बल पाच तरुण एकाच गाडीवर, व्हिडीओ पाहून येईल संताप
The parrot made animal noises with the mic in front
अरे हा किती बोलतो? माईक पुढ्यात घेऊन पोपटाने काढले प्राण्यांचे आवाज; युजर्स म्हणाले, “काही लोकांपेक्षा तो खूप स्मार्ट”
Horrible video
VIDEO : बापरे! चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने केला हल्ला, व्हिडीओ पाहून अंगावर येईल काटा
A wild animal stole the elephant's ear Seeing the Video
बापरे! जंगली प्राण्याने पळवला चक्क हत्तीचा कान; VIDEO पाहून डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

पाहा व्हायरल व्हिडीओ

indian_wrestlers_777 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नाद…वयात काय ठेवलं आहे. अंगात कसा आणखी जोर आहे.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाघ म्हातारा झाला तरी तो वाघच असतो” तर एका युजरने लिहिलेय, “नाद पाहिजे वय फक्त एक आकडा आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

हेही वाचा : “जब कोई बात बिगड जाये…” मैत्रीणीचं गाण ऐकताच तरुणी ढसाढसा रडली, VIDEO पाहून तुम्हीही व्हाल भावूक

काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील छात्रांसह चक्क नौदल प्रमुखांनी पुशअप्स मारले होते. नौदलाच्या पांढऱ्या गणवेशात असलेल्या ६१ वर्षीय नौदलप्रमुखांनी जमिनीवर हात टेकवून तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने पुशअप्स मारले होते. जानेवारी महिन्यात पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने विशेष सोहळाही पार पडला होता. देशाच्या नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार या सोहळ्याला उपस्थित होते. त्यावेळी त्यांचा पुशअप्स मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.