पत्राचाळ पुनर्विकास घोटाळय़ाप्रकरणी खासदार संजय राऊत यांना विशेष न्यायालयाने काल (बुधवार) जामीन मंजूर केला. तर दुसरीकडे संजय राऊत यांना जामीन देण्याच्या निर्णयाला तातडीने स्थगिती देण्यास उच्च न्यायालयानेही नकार दिल्याने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दुहेरी तडाखा मिळाला. यामुळे कालपासून शिवसेनेत(ठाकरे गट) जल्लोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आज संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तिघांनीही पत्रकारपरिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या तसेच संजय राऊत यांनीही भावना व्यक्त करत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊतांनी पक्षासाठी दहावेळा तुरुंगात जाण्यास तयार आहे, पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसने आमच्या रक्तात नाही. असंही म्हटलं.

तिथे एकएक तास हा १०० दिवसांसारखा असतो ; मी स्वत:ला… – संजय राऊतांनी सांगितला तुरुंगातील अनुभव!

satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
sanjay raut arvind kejriwal
“केजरीवालांची तुरुंगात हत्या करण्याचा प्रयत्न?”, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “त्यांनी मला जेलमध्ये…”
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
is it good to work 12 hours during pregnancy
गर्भावस्थेत बारा तास काम करणे कितपत योग्य आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात, गर्भावस्थेत किती काम करावे?

पत्रकारपरिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही सर्वजण कुटुंब आहोत, परिवार आहे. मी तुरुंगात गेलो मला खात्री होती, की उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा वहिनी रश्मी ठाकरे हे सर्वजण माझ्या कुटुंबाची काळजी घेतील. त्या एका हिंमतीवर मी तुरुंगात गेलो. मी हेही सांगितलेलं आहे की पक्षासाठी, शिवसेनेसाठी म्हणजे आमच्या शिवसेनेसाठी मला दहावेळा जरी तुरुंगात पाठवलं तरी मी जाण्यास तयार आहे.”

Sanjay Raut Bail Granted : ईडीचा बेकायदेशीर कारभार, तोंडावर आपटले जोरदार – नाना पटोलेंचा टोला!

याशिवाय “शेवटी कधीतरी पक्षासाठी त्याग करण्याची वेळ येते. ती जर माझ्या सारख्याची तयारी नसेल, तर मला गेल्या ४० वर्षांत पक्षाचे जे भरभरून दिलं आहे, त्याच्याशी ती कृतघ्नता ठरेल. बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत आणि आता आदित्य सुद्धा हे जे महान नातं या पक्षाचं आहे, ते सदैव टिकलं पाहिजे. आम्ही सगळे कितीही मोठे झालो, कितीही सर्वोच्चस्थानी पोहचलो तरी हे आम्हाला ज्या पक्षाने दिलेलं आहे, त्या पक्षाशी बेईमानी करणं आणि काहीतरी मला कुठून तरी सुटायचं आहे, मी केलेल्या पापापासून मला मुक्ती हवी आहे, म्हणून माझ्या पक्षाच्या ज्याला मी आई मानतो, त्याच्या पाठीत खंजीर खुपसणे आमच्या रक्तात नाही. माझ्यासारखे असंख्य लोक आहेत, मी एकटा नाही. ” असंही संजय राऊत म्हणाले.

शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे, गट वैगेरे नाही –

याचबरोबर “जो आनंद लोकांना झाला माझ्या सुटकेनंतर ते सगळे शिवसैनिक आहेत. रस्त्यावर जागोजागी जे लोक उतरले होते, ते शिवसेनेवरचं प्रेम आहे आणि शिवसेना महाराष्ट्रात एकच आहे, गट वैगेरे नाही. शिवसेना एकच आहे, जिचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत.” असंही यावेळी संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.