मुंबई : ‘‘भीमसेनजींनी गार पाण्याने आंघोळ के ली आणि रात्री १ वाजता त्यांची मैफल सुरू झाली ती पहाटे ३ वाजेपर्यंत. नेहमीप्रमाणे ते उत्तमच गायले. त्यांचा दमसास विलक्षण आहे. अंगात ताप असूनसुद्धा त्यांनी ती मैफल यशस्वी के ली होती, रंगवली होती. रसिकांचे कान तृप्त केले होते, त्यांना मंत्रमुग्ध के ले होते. त्यामुळेच रसिक त्यांच्यावर भरभरून प्रेम करत होते.’’ ‘लोकसत्ता’तर्फे  प्रकाशित झालेल्या ‘भीमसेन’ या विशेषांकातील पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितलेली ही आठवण, भीमसेनजींचे वेगळेपण आणि मोठेपण सांगणारी.

 गानदिग्गज पंडित भीमसेन जोशी यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात आदरांजली वाहण्यासाठी ‘भीमसेन’ हा विशेषांक ‘लोकसत्ता’ने तयार केला. या अंकाला राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. या विशेषांकात त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये सांगणाऱ्या अनेक मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. भीमसेनजींच्याच किराणा घराण्याच्या ज्येष्ठ कलावती डॉ. प्रभा अत्रे, प्रसिद्ध कलावंत आणि संगीताचे अभ्यासक पं. सत्यशील देशपांडे, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या अनेकांचे लेख असलेला हा अंक आता उपलब्ध आहे. त्यातील लेख, छायाचित्रे आणि आठवणी यामुळे तो केवळ वाचनीयच नसून संग्राह्यही झाला आहे. संगीतप्रेमींसाठी शब्दपर्वणी असलेल्या या अंकाची प्रत जवळच्या विक्रेत्याकडून आजच मिळवा.

प्रायोजक…
मुख्य प्रायोजक : पिनॅकल ग्रुप
सहप्र्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी),
पुनीत बालन ग्रुप