शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जातीयवादाचा गंभीर आरोप केला आहे. “पंतप्रधान मोदी निवडणुकीत पराभव दिसला की प्रचारात जातीची ढाल पुढे करतात,” असा आरोप संजय राऊतांनी केला. तसेच मोदींवर प्रचारात जातीचा वापर करण्याची वेळ आली आहे का? असा सवालही केला. ते बुधवारी (८ नोव्हेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला ओबीसीच मानतात का? ते स्वतःला देशाचे पंतप्रधान मानत नाहीत का? पंतप्रधानांवर आपल्या जातीला प्रचारात वापरण्याची वेळ आली आहे का? आपल्या प्रिय पंतप्रधान मोदींना कुणीतरी हे सांगितलं पाहिजे की, या देशाच्या पंतप्रधानाला ना जात असते, ना धर्म.”

What Sharad Pawar Said About Modi?
“मोदींच्या विरोधात लोकांमध्ये रोष असल्यानेच आता भाजपा हिंदू-मुस्लिम..”, शरद पवारांचा हल्लाबोल
Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Shashi Tharoor talk on PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोण? काँग्रेस नेते शशी थरूर म्हणतात…

“…तेव्हा मोदी आपल्या जातीची ढाल पुढे करतात”

“पंतप्रधान मोदी जेव्हा एखाद्या निवडणुकीला सामोरं जातात आणि निवडणुकीत पराभव होईल, अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते आपल्या जातीची ढाल पुढे करतात. पंतप्रधान आपल्या जातीविषयी बोलतात हे देशासाठी चांगलं नाही,” असं म्हणत संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला.

हेही वाचा : “हिशोब होईल, ११ नोव्हेंबरला…”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

“भाजपा दोन समाजात भांडण लावत आहेत”

खासदार विनायक राऊतांनीही भाजपावर मराठा आणि ओबीसीत भांडण लावल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “भाजपा केवळ मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावण्याचं काम करत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने दुरावा कसा निर्माण होईल, दोन्ही समाज एकमेकांविरोधात कसे रस्त्यावर उतरतील यासाठी भाजपा सक्रीय आहे.”