मुंबई : इंधनाचा खर्च आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कमीत कमी इंधन आणि विजेचा वापर करण्याकडे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचा (एनएचएसआरसीएल) कल आहे. विजेची गरज भागवण्यासाठी एनएचएसआरसीएलने अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प साकारण्यात येत आहे. बुलेट ट्रेनच्या ठाणे आणि साबरमती डेपोमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून हे काम पूर्ण झाल्यास बुलेट ट्रेनच्या डेपो व इतर परिसरातील विजेचे दिवे, पंखे व इतर लहान उपकरणासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात येईल.

मुंबई – अहमदाबाददरम्यान ५०८ किमी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे तीन मोठे रोलिंग स्टॉक डेपो उभारण्यात येणार आहेत. जपानमधील शिंकनसेन डेपोच्या धर्तीवर या डेपोची रचना केली जाणार आहे. तीनपैकी एक रोलिंग स्टॉक डेपो ठाण्यात, तर उर्वरित दोन गुजरातमधील साबरमती आणि सुरत येथे उभारण्यात येतील. तेथे बुलेट ट्रेनची देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतील. ठाणे डेपो सुमारे ५५ हेक्टर क्षेत्रफळाच्या भूखंडावर उभारण्यात येणार आहे. त्यात सुरुवातीला चार तपासणी मार्गिका आणि १० उपमार्गिका (स्टेबलिंग) बांधण्यात येणार आहेत.

Oben Electric confirms Rorr EZ Launch Date
Oben Electric Rorr EZ : आता बदलतं तापमान सहन करणार तुमची इलेक्ट्रिक बाईक; ‘या’ दिवशी होणार लाँच, पाहा कसे असतील फीचर्स
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
kalyan Dombivli firecracker shop
कल्याण-डोंबिवलीतील वर्दळीच्या रस्त्यांवरील फटाक्यांचे मंच हटवा, प्रवाशांसह वाहन चालकांची मागणी
India is emerging as worlds third largest power generation and power consumption country
क्षेत्र अभ्यास – ‘पॉवर मोड ऑन’!
local express train got disrupted due to traffic jam at diva railway crossing gate
दिवा रेल्वे फाटकातील वाहन कोंडीमुळे  लोकल, एक्सप्रेस खोळंबल्या; शिळफाटा वाहन कोंडीत
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
air quality deteriorated in pune city due to diwali firecracker
शहरभर फटाक्यांची तुफान आतषबाजी… हवेची गुणवत्ता खालावली…
new method developed to find out connection between building material and temperatures
बांधकाम साहित्य आणि तापमानांचा संबंध शोधणारी नवी पद्धत विकसित, काय आहे पद्धती वाचा…

हेही वाचा…मध्य रेल्वेच्या आरपीएफने एका तिकीट दलालाला पकडले, ३८ हजार रुपयांची १४ इ-तिकिटे ताब्यात

भविष्यात त्या अनुक्रमे ८ आणि ३१ पर्यंत वाढविल्या जातील. सर्वाधिक मोठा रोलिंग स्टोक डेपो साबरमती येथे उभारण्यात येणार असून सुमारे ८३ हेक्टर क्षेत्रफळावर उभारला जाणार आहे. तेथे वॉशिंग प्लांट, वर्कशॉप, शेड असणार आहे. या डेपोत १० उपमार्गिका नियोजित असून भविष्यात २९ उपमार्गिका वाढवल्या जातील. या दोन्ही डेपोंमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना आहे. त्यानुसार डेपो शेड आणि इमारतींची रचना केली जाणार आहे. एकट्या साबरमती डेपोत सुमारे १४ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता असेल. ठाण्यातील डेपोमधील सौरऊर्जा निर्मितीची क्षमतेबाबत नियोजन केले जात आहे, अशी माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या (एनएचएसआरसीएल) वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

सुरतमध्ये ४० हेक्टर क्षेत्रफळावर रोलिंग स्टोक डेपो उभारण्यात येणार आहे. सुरत स्थानकापासून साधारण २ किमी अंतरावर तो उभारण्यात येणार आहे. दोन उपमार्गिका नियोजित असून भविष्यात त्यांची संख्या चार करण्यात येईल. मात्र सुरत डेपो इतर डेपोच्या तुलनेत लहान असून सध्या तरी येथे सौरऊर्जा निर्मितीबाबत कोणतेही नियोजन नसल्याचे एनएचएसआरसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा…मुंबई : वाढत्या उकाड्यात पक्षांना थंडावा देण्याचा पालिकेचा प्रयत्न, ५०० उद्यानांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय

सध्या ठाण्यात पाण्याची टंचाई नसली तरी, साबरमती, सुरत येथे आहे. मात्र, जलस्त्रोत व्यवस्थापन तिन्ही डेपोत केले जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाईल. तसेच सुमारे ७० टक्के पाण्याची गरज पुनर्वापर केलेल्या पाण्यापासून भागवली जाईल. यासह कचऱ्याचे व्यवस्थापन प्रत्येक डेपोत केले जाईल, असे एनएचएसआरसीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.