शिवसेना खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत. संजय राऊत नियमित तपासणीसाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले आहेत. संजय राऊत यांना ११ नोव्हेंबर रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. तपासणी झाल्यानंतर संजय राऊत मातोश्रीवर बोलावण्यात आलेल्या आमदारांच्या बैठकीसाठी रवाना होतील अशी माहिती आहे.

सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाल्यापासूनच शिवसेनेची बाजू आक्रमकपणे मांडणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना ११ नोव्हेंबर रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर संजय राऊत यांना अतिदक्षता विभागात ठेवून आवश्यक चाचण्या आणि अँन्जिओग्राफी करण्यात आली होती. त्यात दोन ब्लॉकेजेस आढळळ्याने डॉ मॅथ्यू यांनी त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टी केली होती. दोन दिवस विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. १३ नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.