गुरूवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी विभागातील भिंबर गली ते पुंछ मार्गावर अज्ञात अतिरेक्यांनी लष्कराच्या वाहनावर बेछूट गोळीबार केला. यावेळी अतिरेक्यांनी फेकलेल्या ग्रेनेडमुळे वाहनाने पेट घेतला होता. यामध्ये राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात संतापाची लाट असताना यावरून ठाकरे गटानेही मोदी सरकावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारला सुनावले. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून ही टीका करण्यात आली.

हेही वाचा – “…तर अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात”; भाजपा नेते रावसाहेब दानवेंचं सूचक विधान!

CRPF killed 1 terrorist in Pulwama
काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, CRPF च्या जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
violence in bengal before election
NIA च्या पथकावर हल्ला, पश्चिम बंगालमधील वातावरण तापले; वाचा याआधीच्या निवडणुकांमधील हिंसाचाराचा इतिहास
Who was the first prime minister of India
कंगना रणौत म्हणते त्याप्रमाणे खरंच, नेहरू नाही तर सुभाषचंद्र बोस होते का भारताचे पहिले पंतप्रधान?

ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?

“केंद्रातील मोदी सरकार ३६५ दिवस निवडणुकांच्या राजकारणात, विरोधकांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याच्या कारस्थानात अडकून पडले आहे. त्यामुळे पुलवामा, उरी, पठाणकोटपासून कालच्या पुंछ-जम्मू मार्गापर्यंत आमच्या जवानांवर अतिरेक्यांचे हल्ले सुरू आहेत. २०१६ मध्ये देशात नोटाबंदी लादली तेव्हा काळ्या पैशाबरोबर दहशतवाद संपविण्याचेही कारण देण्यात आले होते. मात्र, कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. पुलवामाचा हल्लादेखील नोटाबंदीनंतरच झाला होता. मात्र त्यावर पंतप्रधान काहीही बोलले नाही. आता जम्मू-पुंछ मार्गावरील हल्ल्याबाबतही ते शांत आहेत. त्यामुळे आता युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा”, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

“कश्मीर खोरे शांत नाही, दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच”

“देशाचे गृहमंत्री व भक्तांचे ‘प्रतिपोलादी पुरुष’ अमित शाह हे कामाच्या ओझ्याखाली दडपून गेले आहेत. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जिंकण्याचा भार त्यांच्यावर आहे. पुन्हा २०२४ आधी देशातील सर्व विरोधी पक्ष मोडून विस्कळीत करायचे आणि भाजपला पुन्हा विजयी करायचे या कामातही ते व्यस्त आहेत. गृहमंत्री, संरक्षणमंत्री व पंतप्रधान राजकीय कामात व्यस्त असल्याचा फायदा घेऊन पाकड्या अतिरेक्यांनी जम्मू-कश्मीरात लष्कराच्या वाहनांवर बॉम्ब फेकले. त्यात आपल्या पाच जवानांना हौतात्म्य प्राप्त झालं. कश्मीर खोरे शांत नाही व दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच आहेत हे पुन्हा उघड झाले”, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

“काश्मीर प्रश्न शांततेच्या मार्गाने संपवता येईल काय?”

“पुंछ-जम्मू मार्गावर दहशतवादी आपल्या जवानांवर बॉम्बहल्ले करीत असताना आपले पंतप्रधान दिल्लीत जागतिक बौद्ध शिखर परिषदेत भाषण देत होते. यावेळी पंतप्रधानांनी जगाला सांगितले, ‘‘भारत युद्धाच्या नव्हे तर बुद्धाच्या मार्गावरूनच वाटचाल करतोय.’’ बुद्धाचा मार्ग हा शांततेचा मार्ग आहे. त्याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, पण कश्मीर खोऱ्यात दहशतवादी जो हिंसाचार रोज घडवीत आहेत, तो शांततेच्या मार्गाने खरंच संपवता येईल काय?” असा प्रश्नही ठाकरे गटाने विचारला.

हेही वाचा – “जे वाजपेयी-अडवाणींना जमलं नाही, ते मोदींनी करून दाखवलं”, अजित पवारांकडून PM मोदींचं कौतुक

काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावरून मोदी सरकावर हल्लाबोल

पुढे बोलताना काश्मीरी पंडितांच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. “कश्मीरात ३७० कलम हटवूनही हिंसाचार थांबलेला नाही व शांतता नांदताना दिसत नाही. कश्मिरी पंडितांच्या ‘घर वापसी’चे वचनही हवेत विरले. उलट सरकारी कर्मचारी असलेल्या पंडितांना कार्यालयात घुसून अतिरेकी ठार करीत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात पंडितांनी जम्मू आणि श्रीनगरात आंदोलन केले, पण सरकारतर्फे कोणीही पंडितांचे साधे निवेदन स्वीकारायला गेले नाही. हे हिंदू पंडितांचे दुर्दैवच म्हणावे लागेल”, असं ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींना लगावला टोला

“भारताच्या दुष्मनांना धडा शिकवू, गोळीला गोळीने उत्तर देऊ, पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवू, पाकने गिळलेला कश्मीर पुन्हा मिळवून अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पूर्ण करू व ते करण्याइतकी ५६ इंचाची आपली छाती असल्याचे पंतप्रधानांकडून छातीठोकपणे सांगितले जाते, पण प्रत्यक्षात कश्मीरच्या भूमीवर आणि लडाख, अरुणाचलच्या भूमीवर उलटेच घडताना दिसत आहे. मोदी हे कालपर्यंत युद्धाची भाषा करीत होते, ते आता बुद्धाची भाषा बोलू लागले. सत्य सांगायचे तर पाकड्यांसमोर ते युद्धाची भाषा करतात, पण चीनच्या आक्रमणापुढे त्यांना बुद्ध आठवतो”, असा टोलाही त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला.